चोरीच्या ११ मोटारसायकली हस्तगत सदर बझार पोलिस ठाण्याची दमदार कामगिरी…
आरोपीला अटक...

सदर बझार पोलीस ठाणे येथे गेले काही दिवसापासून मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यामध्ये सतत वाढ होत होती. त्या अनुषंगाने मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे हद्दीत वेगवेगळी पथके तयार करुन पाळत ठेवण्यात येत होती.
दि.31/07/2025 रोजी रात्री 11.30 वा ते दि.01/08/2025 रोजीचे सकाळी 07.00 वा च्या दरम्यान घर नं.298 दक्षिण सदर बझार बेरीया हॉलच्या समोर, सोलापूर येथे पार्क केलेली फिर्यादी यांच्या मालकीची हिरो पेंशन प्रो कंपनीची मोटार सायकल क्र. MH13DF7304 ही हॅन्डल लॉक करुन पार्क करुन ठेवली असता ती कोणीतरी अज्ञात चोरटयाने हॅन्डल लॉक तोडून लबाडीच्या इराद्याने चोरुन नेली आहे. वगैरे मजकुराची फिर्याद दिनांक 06/08/2025 रोजी फिर्यादी यांनी दिल्याने गु.र.नं. 642/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2), 3(5) अन्वये सदर बझार पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
या गुन्ह्याची तात्काळ दखल घेऊन गुन्हे प्रगटीकरण पथकातील विविध पथके तयार करण्यात आले त्यानुसार सदर बझार पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटिकरण पथकाचे सपोनि सागर काटे व त्यांचे पथक गस्त घालत आसताना दि.06/08/2025 रोजी पोलिस अंमालदार विशाल बोराडे व पोलिस अंमलदार हणमंत पुजारी यांना एक संशयीत इसम हरीभाई प्रशालेचे मागील बाजुस संशयीत रित्या फिरत असल्याची माहिती मिळालेने सदर ठिकाणी जाऊन मोटार सायकल चोरीच्या अनुषंगाने गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या हिरो फॅशन मोटार सायकल क्रमांक MH-13 DF 7304 वर एक इसम संशयीतरित्या फिरत असताना दिसुन आल्याने त्याचा पाठलाग करुन त्यास पकडले व त्याचे नाव गांव बाबत विचारणा केली असता त्याने त्याचे नाव – साहिल महेबूब शहापूरे वय-22 रा. 333 दक्षिण सदर बझार, अशोक नगर, मुर्गी नाला जवळ, सोलापूर असे असल्याचे सांगितले त्याच्याकडे त्याच्या ताब्यात असलेल्या मोटार सायकल बाबत तसेच कागदपत्राबाबत विचारणा करता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने सदरची मोटार सायकल ही चोरीची असल्याचा दाट संशय आल्याने सदर इसमास मोटार सायकल सह पोलीस ठाणे येथे आणून त्याच्याकडे चौकशी करता सदरची मोटार सायकल ही चोरी केल्याचे त्याने सांगीतल्याने दोन पंचासमक्ष पंचनामा करुन वर नमूद मोटार सायकल उपरोक्त गुन्हयात तपासीक अंमलदार पोह/सागर सरतापे यांनी जप्त केलेली आहे.
आरोपीत नामे साहिल महिबूब शहापूरे यास विश्वासात घेऊन त्याच्याकडे कौशल्याने तपास केला असता त्याने खालील नमुद वर्णनाच्या एकूण 11 मोटार सायकली वेगवेगळ्या ठिकाणावरुन चोरी केल्याचे कबुली दिली असुन त्यापैकी 08 मोटार सायकली या चालु स्थितीत तसेच 03 मोटार सायकली या तोडुन त्याचे पार्ट वेगवेगळे केल्याचे सांगीतले. आरोपीत याचेकडुन चोरी केलेल्या चालु स्थितीतील 08 मोटार सायकली तसेच 03 मोटार सायकलीचे रूप केलेले वेगवेगळे पार्ट, पंचनाम्या अंतर्गत ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत.
चोरीस गेलेल्या 11 मोटार सायकल पैकी 1) सदर बझार पो. ठाणे कडील 06 गुन्हे, 02) एमआयडीसी पो. ठाणे कडील- 02, 03) फौजदार चावडी पो. ठाणे कडील 01 गुन्हा 04) जेलरोड पो. ठाणे कडील -01 गुन्हा व इतर 01 असे गुन्हे उघडकीस आलेले आहेत.
वरील गुन्ह्यांपैकी आरोपीताने स्क्रैप केलेल्या मोटार सायकल ह्या त्याने त्याचे दुकानी केले असून, सदरचे दुकान आरोपीताचे वडिल नामे – महेबूब शहापूरे यांचे नावे आहे. त्यांना त्यांचा मुलगा मोटार सायकल चोरी करतो याची जाणीव असताना देखील त्यांनी त्यांचे दुकान आरोपीस स्क्रप करण्याकरीता उपलब्द करुन मदत केली. तसेच आरोपीताने चोरी करुन आणलेल्या मोटार सायकल स्क्रैप करणेस मदत करणारा इसम नामे महेबूब ऊर्फ बाबू बागवान याने मदत केली. तसेच नमुद आरोपी हा मोटार सायकली चोरुन त्याचा स्क्रैप माल विक्री करतो हे माहिती असताना देखील गुडलक ट्रेडर्सचे मालक रहिम इरफान शेख यांनी स्क्रैप मोटार सायकलचे पार्ट विकत घेतले असे गुन्हयाच्या तपासात निष्पन्न झालेने वरील नमुद यांचा गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याने त्यांना आरोपी करण्यात आले आहे. मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने अधिक तपास करण्यात येत आहे.
ही कामगिरी एम. राजकुमार, पोलीस आयुक्त, विजय कबाडे, पोलीस उपआयुक्त परिमंडळ, सुधिर खिरडकर सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग-2, नामदेव बंडगर वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भालचंद्र ढवळे पोलीस निरीक्षक (गुन्हे), यांच्या मार्गदर्शनाखाली, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर काटे, सहाय्यक फौजदार औदुंबर आटोळे, पोहेको शहाजहान मुलाणी, पोहेकॉ राजेश चव्हाण, पोह/संतोष पापडे, पोह/सागर सरतापे, पोहा एयाज बागलकोटे, पोकों/ सागर गुंड, पोकों/सोमनाथ सुरवसे, पोकों/ हणमंत पुजारी, पोकों/ विशाल बोराडे, पोकों/ अनमोल लट्टे, पोकों/ उमेश चव्हाण, पोकों/ राम भिंगारे, पोकों परशुराम म्हेत्रे, पोकों/ अर्जुन गायकवाड यांनी केली आहे…



