
सोलापूर
मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांना जिल्ह्यात MD पुरवठ्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेला कारवाईचे आदेश देण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक सुरज निंबाळकर यांच्या पथकाने पुणे-सोलापूर मार्गावरील पाकणी पाटी येथे वाहन तपासणीदरम्यान चौघांना पकडले. त्यांच्या कारच्या डिकीतून स्पेअर व्हीलजवळ १८ ग्रॅम मेफेड्रोन मिळाले.
तपासात उघड झाले की हे चौघे सोलापूर शहरातील आणखी चौघांच्या मार्फत जिल्ह्यात MD ची विक्री करत होते. त्यानंतर उर्वरित चौघांनाही अटक करण्यात आली.
सध्या आरोपींकडून MD चे स्त्रोत आणि उत्पादनस्थळाबाबत तपास सुरू आहे.
ही कारवाई मा. श्री. अतुल कुलकर्णी (पोलीस अधीक्षक), मा. श्री. प्रितम यावलकर (अपर पोलीस अधीक्षक), मा. श्री. संजय जगताप (पोलीस निरीक्षक, स्था. गु. शा.) यांच्या मार्गदर्शनाखाली, दिपक भिंताडे (पो. नि., सायबर पोलीस ठाणे) व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.
— सोलापूर ग्रामीण पोलीस



