crimemaharashtrapoliticalsocialsolapur

जीएसटी वकीलाच्या जामीन आदेशातील 10 कोटी भरण्याची अट सत्र न्यायालयाकडून रद्द… ॲड शशी कुलकर्णी 

सोलापूर-

HTML img Tag Simply Easy Learning

येथील रहिवासी व जी एस टी सल्लागार वकील साजिद अहमद शेख वय ४६, रा. सोलापूर यास सुमारे 44 कोटी रुपयांचा जी एस टी कर बुडविल्याच्या गुन्ह्यात कोल्हापूर येथील न्यायदांडाधिकारी कोर्टाने घातलेली 10 कोटी रक्कम कोर्टात जमा करण्याची अट सत्र न्यायालयाकडून रद्द करण्यात आली. यात जी एस टी कार्यालयाचा आरोप असा की, सोलापूर येथील जी एस टी सल्लागार वकील साजिद अहमद शेख याने ,प्रत्यक्षात वस्तूंची विक्री न करताच बनावट बिलांच्या आधारे कर चोरी केल्याचा संशय होता, सदर आरोपीने शासनाची गेल्या चार वर्षापासून कर चोरी करून फसवणूक केल्याप्रकारणी दिनांक 22/5/2025 रोजी अटक केली होती.

 

 

 

सदरकामी आरोपीने कोल्हापूर येथील न्यायदंडाधिकारी कोर्टात जामीन अर्ज दाखल केला होता. सदरचा जामीन अर्ज 10 कोटी रक्कम कोर्टात जमा करण्याचा तसेच इतर अटी व शर्तीवर मंजूर केला होता. सदर 10 कोटी रक्कम भरण्याच्या अटी विरुद्ध आरोपीने कोल्हापूर येथील सत्र न्यायालयामध्ये अपील दाखल केले. सदर सुनावणी वेळी आरोपीच्या वकिलांनी न्यायाल्यासमोर असा युक्तिवाद केला की, सदर अट कायाद्यास व नैसर्गिक न्याय तत्वास धरून नाही,याकामी सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे सादर केले त्याविरुद्ध आरोपीच्या अट शिथिल करण्याच्या अर्जास सरकारी वकिलांनी तीव्र विरोध केला.

 

 

तथापि आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून सत्र न्यायालयाने आरोपीस 10 कोटी रुपये भरण्याची प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोर्टाची अट रद्द करुन आरोपीस रुपये 50000 चे जात मुचलक्याच्या जमिनीवार सोडण्याच्या आदेश परित केला..

या प्रकरणात आरोपीतर्फे यांचेतर्फे अॅड. शशी कुलकर्णी, अॅड. गुरुदत्त बोरगांवकर, अॅड.देवदत्त बोरगावकर, अॅड.प्रसाद अग्निहोत्री अॅड. आदित्य अदोने यांनी तर सरकारतर्फे विशेष सरकारी वकील अॅड.शेखर टोणपे यांनी काम पहिले.
प्रकरण क्रमांक Cr MA 93/2025.
कोर्ट – अति. सत्र न्यायाधीश शैलेंद्र तांबे साहेब

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button