राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध हातभट्टी केंद्रांवर धाड ,८९ ढाबे चालकांवर गुन्हा दाखल: अधीक्षक भाग्यश्री जाधव..
१३७ आरोपींवर गुन्हे नोंद....

राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांची मा. श्री सागर धोमकर साहेब विभागीय उपायुक्त पुणे विभाग याच्या निर्देशानुसार मा. श्रीमती भाग्यश्री पं. जाधव, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर मा. श्री एस आर पाटील उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर याचे मार्गदर्शनाखाली दि. ०१/०४/२०२५ व २२/०४/२०२५ या कलावधीत रोजी राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांची सोलापूर शहर व जिल्ह्यात केलेल्या अवैध हातभट्टी निमिती केद्रावर/अवैध देशी-विदेशी मद्य विक्री व वाहतुकीवर केलेल्या धडक कारवाईत एकुण २०५ गुन्हे नोंद करण्यात आले असुन २२१ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. सदर कारवाईत ५४,३२० ली. रसायन, २१९५ लि. हातभट्टी दारु, ४९९.१९ ब. लि. देशी मद्य, ४९८.७४ ब.ली. विदेशी मद्य, ९०.५२ ब.ली. बिअर, ३४८ ली. ताडी तसेच ११ वाहनासह एकुण रूपये ४०,८६,७४७/- रुपयाचा प्रोव्हि. गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तसेच या विभागाकडुन या कालवधीत अवैध मद्य विक्री करणा-या व मद्य पिण्यास परवानगी देणा-या एकूण ८९ ढाब्यावर गुन्हे नोंदविण्यात आले असून १३७ आरोपींवर कारवाई करण्यात आलेली आहे. हॉटेल मोरया, हॉटेल काका, रॉयल ढाबा, सुमित कोल्ड्रींस,
सवजी ढाबा, सम्राट ढाबा, जय मल्हार ढाबा, वैष्णवी ढाबा, मैत्री ढाबा, द सॅम ढाबा, श्री ढाबा, विकास हॉटेल, मातोश्री ढाबा, जय भवानी ढाबा, कोळिवाडा, ढाबा, स्वाद ढाबा, दुर्गा ढाबा, व इतर अश्या ढाब्यावर कलम ६८ व ८४ अन्वये ३५ जणांवर कारवाई करण्यात आली असून मा. न्यायालयाने ढाबा मालक व मद्यपी ग्राहक असे मिळुन एकुण रुपये १,७२,५०० इतक्या द्रव्य दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
सदर कारवाई निरीक्षक श्री. आर. एम. चवरे, श्री जे. एन पाटील, श्री ओ व्ही घाटगे, श्री. राकेश पवार श्री पंकज कुंभार, सचिन भवड, तसेच दुय्यम निरीक्षक श्री एस डी कांबळे, श्री आर. अंजली सरवदे, श्री कदम, राम निंबाळकर सहाय्यक दुय्यम निरीक्षक श्री. मुकेश चव्हाण, श्री मोहन जाधव, संजय चव्हाण, विजय पवार जवान सर्वश्री आण्णा करचे, नंदकुमार वेळापूरे, शोएब बेगमपुरे, वसंत राठोड, चेतन व्हनंगुटी, इसमाईल गोडीकट, प्रशांत इगोले अनिल पांढरे, विनायक काळे, पवन उगले, योगीराज तोग्गी महिला जवान शिवानी मुढे वाहनचालक रशीद शेख व दिपक वाघमारे यांनी पार पाडली…
अवैध मद्यविक्री. अवैध निर्मिती व वाहतूकी विरोधात कारवाई या पुढेही चालू राहणार असून अवैध मद्याबाबत माहिती असल्यास टोल फ्री १८००२३३९९९९ क्रमांक अथवा व्हॉटस अॅप क्रमांक ८४२२००११३३ या कार्यालयास माहिती दिल्यास माहिती देणा-याचे नाव गुप्त ठेवले जाईल असे श्रीमती भाग्यश्री पं. जाधव, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क. सोलापुर यांनी सांगुन अवैध मद्याबाबतची माहिती कळविण्याचे आवाहन केले आहे.