जबरी चोरी ०१, चैन स्नॅचिंग ०४ व बसस्थानकातील चोरीचे ०९ असे एकूण १४ गुन्हे उघडकीस स्थानिक गुन्हे शाखेची उल्लेखनीय कामगिरी…
२१,९०,०००/- रूपयांचा मुद्देमाल जप्त....

सोलापूर
अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी दिनांक १६ डिसेंबर २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील अधिकारी व अंमलदार यांची बैठक घेवून सोलापूर ग्रामीण जिल्हयातील एस.टी. स्टॅन्ड मध्ये प्रवाशी एस.टी.मध्ये चढताना गर्दीचा फायदा घेवून प्रवाशांच्या गळयातील सोन्याचे दागिने चोरी होण्याच्या घटना होत असल्याने तसेच जिल्ह्यातील जबरी चोरी, मोटार सायकलवरून येवून गळ्यातील सोन्याचे दागिणे ओढून घेवून जाणारे आरोपी हे गुन्हे करत होते. यामुळे मा. पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी या गुन्ह्यांचे विश्लेषण करून असे गुन्हे उघड आणण्याबाबत आदेशीत केले होते.
त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांना आदेशीत करण्यात आले होते. आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी गुन्हेशाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे व पोलीस उपनिरीक्षक कुलदिप सोनटक्के यांचे पथक तयार करुन त्यांना सोलापूर जिल्हयात अशा पध्दतीचे गुन्हे घडलेल्या ठिकाणचे सी.सी.टी.व्हि. फुटेज प्राप्त करुन घेवून त्याचे तांत्रिक विश्लेषण करुन गुन्हे उघडकीस आणणेकामी योग्य ते मार्गदर्शन केले होते.
त्यातील पोउपनि कुलदीप सोनटक्के यांच्या पथकातील पोकॉ प्रमोद शिंपाळे यांनी सी.सी.टी.व्हि. फुटेज प्राप्त करुन घेवून त्याचे तांत्रिक विश्लेषण करुन आरोपी निष्पन्न केले. तसेच पोहेकों/ सलीम बागवान यांनी जिल्हयात घडलेल्या एस.टी. स्टॅन्ड परिसरातील गुन्हयांचे तांत्रिक विश्लेषण करुन माहिती संकलीत केली. सदरचे पथक हे आरोपींच्या मागावर असताना, गुन्हे शाखेकडील सहा. फौजदार प्रकाश कारटकर, प्रमोद शिंपाळे यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, बीड जिल्हयातील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांच्या दोन टोळया सोलापूर जिल्हयात एस.टी. स्टॅन्ड वरील चोऱ्या करण्यासाठी येणार असून पैकी एक टोळी टेंभूर्णी एस.टी. स्टॅन्ड व दुसरी टोळी हे चारचाकी वाहनासह अक्कलकोट शहरातील एस.टी. स्टॅन्ड परिसरात चोऱ्या करण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली.
त्याबातमीच्या अनुषंगाने अक्कलकोट येथे शोध घेतला असता, बातमी प्रमाणे दोन इसम संशयितरित्या मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेवून त्यांचे नांव व पत्ते विचारले असता, त्यांनी त्यांची नांवे किरण आजिनाथ गायकवाड, वय २५ वर्षे, व राम पांडूरंग दुधाळ वय २५ वर्षे, दोघे रा. हिवरसिंगा ता. शिरुर कासार जि. बीड असे असल्याचे सांगितले. अक्कलकोट येथे मिळून आलेल्या आरोपीतांकडे सोलापूर ग्रामीण जिल्हयातील एस.टी. स्टॅन्ड परिसरात घडलेल्या चोऱ्यांबाबत कौशल्यपूर्ण तपास करता त्यांनी सोलापूर ग्रामीण जिल्हयातील वैराग, अक्कलकोट एस.टी. स्टॅन्ड व अक्कलकोट रोड रेल्वे स्टेशन येथील एस.टी. स्टॅन्ड मध्ये गर्दीचा फायदा घेवून बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गळयातील सोन्याचे दागिने कट करुन चोरी केले असल्याचे सांगितले. त्यावरुन त्या दोन्ही आरोपींना अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे गुरनं २८३/२०२५ बीएनएस 303(2), 3(5) प्रमाणे दाखल गुन्हयात अटक करुन त्यांची पोलीस कस्टडी रिमांड घेवून तपासामध्ये त्यांचेकडून एकूण ०८ एस.टी. स्टॅन्ड चोरीचे गुन्हे उघडकीस आणले..
तसेच टेंभूर्णी एस.टी. स्टॅन्ड परिसरातून संशयितरित्या मिळून आलेल्या 03 इसमांना ताब्यात घेवून त्यांना नांव पत्ता विचारता त्यांनी त्यांची नावे
1) दत्ता उर्फ सोन्या विजय गायकवाड, वय २५ वर्षे
2) शाम साहेबराव उबाळे, वय 33 वर्षे, रा. गांधीनगर ता. बीड
3) बाळासाहेब प्रकाश गायकवाड, वय 34 वर्षे, रा.
नाळवंडीनाका बीड असे असल्याचे सांगून त्यांनी टेंभूर्णी एस.टी. स्टॅन्ड येथे एस.टी. स्टॅन्ड येथे चोरी केल्याचे सांगितल्याने त्यांना टेंभूर्णी पोलीस ठाणे गुरनं ७७४/२०२५ बीएनएस 303(2), 3(5) प्रमाणे दाखल गुन्हयात अटक करुन त्यांची पोलीस कस्टडी रिमांड घेवून तपासामध्ये त्यांचेकडून ०१ एस.टी. स्टॅन्ड चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे.
सदर आरोपीतांकडून सोलापूर ग्रामीण जिल्हयातील एकूण ०९ एस.टी. स्टॅन्ड चोरीचे गुन्हे उघडकीस आणून त्यांचेकडून ११० ग्रॅम वजनाचे १४,३०००० रु. किंमतीचे (बाजार मुल्य भावाप्रमाणे) सोन्याचे दागिने व गुन्हा करण्यासाठी वापरलेले वाहन एमएच ०४ एफआर ३८३३ या एर्टिका ५,००,००० रु. किंमतीचे असा एकूण १९,३०,००० रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे संजय जगताप, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक, विजय शिंदे व त्यांचे पथक अकलुज उपविभागात माळशिरस येथे माला विषयी गुन्हयाचे तपासाकामी गस्त घालत असताना गोपनिय बातमी दारामार्फत बामती मिळाली की, पंढरपूर शहर पोलीस ठाणे गुरंन ६६३/२०२५ प्रमाणे कलम 304 (2) 3(5) प्रमाणे दाखल गुन्हयातील संशयीत आरोपी नामे दुर्योधन उर्फ बबलू कांतीलाल चोरमले सवतगव्हाण माळशिरस येथील बस स्टैंड वर येणार आहे. या बातमीच्या अनुषंगाने सपोनि विजय शिंदे व त्यांचे पथक माळशिरस बस स्थानक येथे पोहोचुन बातमीतील वर्णना प्रमाणे असलेल्या इसमास सापळा रचुन सपोनि शिंदे व त्यांचे पथकाने ताब्यात घेतले. नमुद इसमाकडे नाव गांव पत्ता विचारले असता त्यांने त्याचे नांव दुर्योधन उर्फ बबलू कांतीलाल चोरमले वय २४ वर्ष राहणार गोंदी तालुका इंदापूर जिल्हा पुणे असल्याचे सांगितले. नमुद आरोपी कडे अधिक तपास करता सदरचा पंढरपूर शहर पोलीस ठाणे गुरंन ६६३/२०२५ प्रमाणे कलम 304(2) 3(5) गुन्हा त्याने त्याचे साथीदार नामे गुणाल जाधव राहणार गट क्रमांक ०२ महाळुंग तालुका माळशिरस जि. सोलापूर याचे सोबत निळुन केल्याची कबुली दिली.
आरोपी नामे दुर्योधन उर्फ बबलू कांतीलाल चोरमले याचेकडे अधिक कसुन तपास केले असता, त्यांने त्याचे साथीदार
1) गुणाल जाधव, रा. गट न 2 महळुंग ता माळशिरस
2) रोहन नेताजी बाबर रा टेंभुर्णी यांनी मिळुन सोलापूर ग्रामीण जिल्हयात खालील पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे केल्याची कबुली केली आहे. आरोपीकडे कौशल्यपुर्ण तपास करत्ता सदर गुन्हयातील चोरीस गेले मुद्देमाल पैकी २० ग्रॅम सोन्याचे दागिने त्याची बाजार भाव किंमत २,६०,०००/- किमतीचे मुद्देमाल हस्तगत करण्यात आले आहे.
ही कामगिरी मा. पोलीस अधिक्षक श्री. अतुल कुलकर्णी, मा. अपर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि नागनाथ खुणे, सपोनि विजय शिंदे, पोलीस उपनिरीक्षक कुलदिप सोनटक्के, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत गायकवाड, सफौ नारायण गोलेकर, प्रकाश कारटकर, धनाजी गाडे, पोह/ सलीम बागवान, मोहन मनसावाले, रवि माने, धनराज गायकवाड, दिपाली जावध, अश्विनी गोटे, पोकों/ प्रमोद शिंपाळे, सागर ढोरे-पाटील विनायक घोरपडे, सूरज रामगुडे, मनोज राठोड, अन्वर अत्तार, बाळराजे घाडगे, योगेश जाधव, अक्षय डोंगरे, संदीप हुलगे, मपोका सुनंदा झळके तसेच टेंभूर्णी पोलीस ठाणेचे सोमनाथ गायकवाड, केशव झोळ, नितीन तळेकर, अकलुज पोलिस ठाण्याकडील पोहेकॉ सुहास क्षीरसागर, विशाल पोरे, सायबर पोलीस ठाण्याकडील व्यंकटेश मोरे यांनी ही कारवाई यशस्वीपणे आहे.



