crimemaharashtrapoliticalsocialsolapur

सोलापूर ग्रामीण पोलीसांकडून ९९८ किलो ५२६ ग्रॅम, १,७८,७६,०२०/- रूपयांचा अंमली पदार्थ गांजाचा मुद्देमाल नाश….

भारत सरकार व पोलीस महासंचालक कार्यालय, मुंबई यांच्या मार्गदर्शक सुचनाप्रमाणे अंमली पदार्थाच्या मुद्देमालाची निर्गती करण्याबात सुचीत केले होते. त्यावरून सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे मा.श्री. अतुल कुलकर्णी यांनी हा मुद्देमाल निर्गती करण्याबाबत अंमली पदार्थ नाश समिती स्थापन केली होती. समितीच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये मागील काही वर्षामध्ये दाखल असलेल्या अंमली पदार्थविषयक गुन्ह्यांचा आढावा घेवून गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थ मुद्देमालातील ज्या गुन्ह्यात मुद्देमालाची मा. न्यायालासमोर इन्व्हेन्ट्री पंचनामा होवून त्यातून काढून दिलेले सॅम्पल तपासणीचा न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेचा अभिप्राय प्राप्त झाला आहे अशा एकूण १२ पोलीस ठाणेकडील १९ गुन्ह्यामधील एकूण ९९८ किलो ५२६ ग्रॅम किंमत रूपये १,७८,७६,०२०/- किंमतीचा “अंमली पदार्थ -गांजा” ची निर्गती करण्याबाबत पूर्वतयारी करण्यात आली होती.

 

 

दि.१४.१०.२०२५ रोजी मा. श्री. अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांच्या अध्यक्षतेखाली मा.श्री. प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक सोलापूर यांच्यासह १) श्री. शिरीष हुंबे, पोलीस उपअधीक्षक, मुख्यालय २) पोनि संजय जगातप, स्थागुशा, ३) एम. आर. कांबळे, वजन मापन निरीक्षक, ४) अभिजीत लोहीया, क्षेत्र अधिकारी, प्रदुषण मंडळ ५) विलास ठाणगे, रासायीन विश्लेशक, सी.ए. पुणे. ६) राहूल पाटील, वैज्ञानिक सहायक सी.ए. पुणे यांच्यासह समितीची बैठक पार पाडली. या समितीच्या बैठकीमध्ये सोलापूर ग्रामीण घटकातील सोलापूर तालुका २, मोहोळ १, कामती-५. बार्शी शहर २, कुडुवाडी १, करमाळा- १, टेंभूर्णी-१, पंढरपूर शहर २, मंगळवेढा- १, अकलूज – १, करकंब १ व वैराग १ अशा एकूण १९ गुन्ह्यातील वजन ९९८ किलो ५२६ ग्रॅम मुद्देमाल नाश करण्याची प्रक्रिया पार पडली. यावेळी हजर शासकीय पंच राम निंबाळकर व शिवकुमार कांबळे, उपनिरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, सोलापूर यांच्या समक्ष पुन्हा वजने करण्यात येवून त्या मुद्देमालातील सॅम्पलची पुन्हा रासायनिक विश्लेषक, न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळा पुणे यांच्या पथकाकडून तपासणी करण्यात आली.

 

 

यामध्ये सदरचा मुद्देमाल हा गांजाच असल्याचा अभिप्राय प्राप्त करून एकूण ९९८ किलो ५२६ ग्रॅम (किंमत रूपये १,७८,७६,०२०/-) गांजा सोलापूर महानगरपालिकेच्या भोगाव येथील कचरा डेपोतील एस.एस. सव्हींसेच्या Incinerator मध्ये समितीच्या समक्ष जाळून नाश करण्यात आलेला आहे….

 

सदर गांजा नाश  अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, मा.श्री. प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, शिरीष हुंबे, पोलीस उप अधीक्षक (मुख्यालय), सोलापूर ग्रामीण, पोनि संजय जगताप, स्थागुशा, पोनि बाजीराव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली, श्रेणी पोउपनि प्रभाकर ताटे-देशमुख, सहा. फौजदार निलकंठ जाधवर, विजयकुमार कोरे, कमल बुरकुल, पोह हरीदास पांढरे, मोहन मनसावाले, आबासाहेब मुंढे, अनिस शेख, पोकों अमोल जाधव, राजेंद्र गवेकर, मपोकों/ सुनंदा झळके यांनी पार पाडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button