maharashtrapoliticalsocialsolapur

मराठा सेवा संघ जातीय संघटना नाही : अमोल शिंदे….

सोलापूर प्रतिनिधी
मराठा सेवा संघ ही कुठल्याही जातीची संघटना नाही. अठरा बलुतेदार व सर्व जाती धर्मांना घेऊन एकत्र काम करणारी ही संघटना आहे. मात्र आजकाल काही विघ्नसंतृष्टी लोक मराठा समाजामध्ये आणि इतर समाजामध्ये दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. याबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पत्रकारांनी आपली लेखणी चालवावी, आणि वास्तव समाजापुढे आणावे असे मत शिवसेना जिल्हाप्रमुख तथा मराठा नागरी पतसंस्थेचे चेअरमन अमोल शिंदे यांनी केले यांनी व्यक्त केले.
तानुबाई बिरजे पत्रकार कक्षाच्या वतीने रविवार दि. 30 मार्च रोजी गुढीपाडवा आणि नूतन मराठी वर्षाच्या वर्षानिमित्त पत्रकारांच्या स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अमोल शिंदे बोलत होते. या प्रसंगी विचारपिठावर मराठा सेवा संघाचे पुणे विभागीय अध्यक्ष प्रशांत पाटील, जिल्हाध्यक्ष डॉ. जे. के. देशमुख, शहराध्यक्ष चंद्रकांत पाटील, समन्वयक दत्ता मामा मुळे, संभाजी ब्रिगेडचे सोमनाथ राऊत, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य…. गायकवाड, सकाळचे निवासी संपादक सिद्धाराम पाटील, आदी उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना अमोल शिंदे म्हणाले आज समाजामध्ये विविध जाती जातीमध्ये तेढ निर्माण झाले आहेत. प्रत्येक समाज एकमेकांकडे वेगळ्या नजरेने पाहत आहे. समाजा समाजामध्ये जातीजातीमध्ये वाद निर्माण करण्याचे काम अनेक वर्षापासून काही विघ्नसंतृष्टी मंडळी करत आहेत.

अशा गोष्टींनाआपला समाज बळी पडत आहे. मात्र मराठा सेवा संघ हा सर्व जाती धर्माला, अठरा पगड जातींना एकत्र घेऊन जाणारी संघटना आहे. वेळोवेळी सिद्ध झाले आहे. पत्रकारांनी देखील वास्तववादी विचार करून आपली लेखणी चालवावी. एखाद्या घटने मागची नेमकी घटनेची घटना काय आहे. त्या घटनेचे समाजामध्ये निर्माण होणारे प्रतिबिंब काय आहेत. याचा विचार करून सकारात्मक दृष्टिकोन लेखन करून वास्तव समाजापुढे आणावे अशी अपेक्षा शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज,आणि संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून जिजाऊ वंदना घेण्यात आली. तानुबाई बिरजे पत्रकार कक्षाचे जिल्हाध्यक्ष दीपक शेळके यांनी प्रास्ताविक भाषणातून कार्यक्रम घेण्यामागची भूमिका विशद केली. मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. जे. के. देशमुख सकाळचे निवासी संपादक सिद्धाराम पाटील, यांचीही भाषणे झाली.

 

प्रमोद बोडके यांनी सत्कारमूर्तीच्या वतीने सत्कारास उत्तर दिले. त्यानंतर विविध दैनिकांमध्ये चॅनेलमध्ये काम करणाऱ्या पत्रकार बांधवांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. सकाळच्या निवासी संपादक पदी निवड झाल्याबद्दल सिद्धाराम पाटील आणि वैभव गाढवे याची वृत्तसंपादक झाल्या प्रित्यर्थ विशेष सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन लक्ष्मण महाडिक तर आभार उपाध्यक्ष सदाशिव पवार यांनी मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आर. पी. पाटील, प्रकाश ननवरे…….. यांनी परिश्रम घेतले
चौकट
या पत्रकार बांधवांचा झाला गौरव
प्रशांत माने तरुण भारत, राकेश कदम लोकमत, संतोष शिरसट पुढारी, प्रमोद बोडके सकाळ, सागर सुरवसे टीव्ही 9, तात्यासाहेब लांडगे सकाळ, अरविंद मोटे सकाळ, अविनाश गायकवाड तरुण भारत , कृष्णकांत चव्हाण पुण्यनगरी, संदीप वाडेकर संचार, रामदास काटकर दिव्य मराठी, पांडुरंग सुरवसे कटू सत्य, विजय बाबर, विशाल भांगे, मकरंद ढोबळे, लक्ष्मीकांत शिंदे, महेश हनमे ,वैभव गंगणे चॅनल प्रतिनिधी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button