crimeindia- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

प्रेमप्रकरण ! गोविंद जगन्नाथ बर्गे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणात आरोपी नर्तिकी पुजा गायकवाड हिचा जामीन अर्ज फेटाळून लावला:- DGP डॉ.प्रदीपसिंग राजपूत…

सोलापूर

व्ही.एस. मलकलपत्ते-रेडडी, अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश बार्शी यांनी नर्तिकी पुजा गायकवाड हिच्या जामीनाचा अर्ज फेटाळून लावला आहे.

या प्रकरणात सविस्तर हकीकत अशी की,

बीड येथील मौजे लुखामसला या गावचे माजी सरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे हे ठेकीदारीचा व्यवसाय करीत मौजे पारगाव, ता. वाशी, जि. धाराशिव येथील तुळजाभवानी कला केंद्र येथील नर्तिकी पुजा देविदास गायकवाड हिच्याकडे जात असल्यामुळे, त्यांची ओळख होवून, सदर ओळखीचे रूपांतर पुढे प्रेमात झाले होते. त्यामुळे नर्तिकी पुजा गायकवाड हिने गोविंद बर्गे यांना अट घातली होती की, “मी तुमची आज पासुन मालकीण म्हणुन काम करते परंतु तुम्ही माझे घरखर्च व माझा घरसंसार पाहायचा”. हे प्रेमसंबंध सुरू असताना, नर्तिकी पुजा गायकवाड हिने स्वतःसाठी व तिच्या नातेवाईकांसाठी महागडे मोबाईल, बुलेट गाडी, घराचे बांधकाम वैराग येथे प्लॉट, नातेवाईकांच्या नावावर शेतजमीन, सोने-नाणे इत्यादीं गोष्टी प्रेमाच्या जाळ्यात अडकवून, गोविंद बर्गे यांच्याकडून प्राप्त करून घेतल्या. गोविंद बर्गे यांनी गेवराईत मोठ्या हौशेने मोठा बंगला बांधला होता आणि ती बातमी नर्तिकी पुजा गायकवाड हिला समजल्यानंतर तिने तो आलिशान बंगला बघण्याचा हट्ट धरला आणि तिला तो बंगला आवडल्याने, हा बंगला तिच्या नावावर करण्याचा तगादा तिने गोविंद बर्गे यांच्याकडे सुरू केला. या बंगल्याची माहिती गोविंद बर्गे यांच्या संपूर्ण कुटूंबास असल्याने, हा बंगला पुजा गायकवाड हिच्या नावावर करण्यास नकार देवून, दुसरा बंगला घेवून देण्याचे आश्वासन गोविंद बर्गे यांनी तिला दिले. तरी सुध्दा, नर्तिकी पुजा गायकवाड हिने हा बंगला तिच्या नावावर करण्याचा तगादा लावून गोविंद बर्गे यांना ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली.

 

 

 

तसेच घटनेच्या 15 दिवसांपूर्वी गोविंद बर्गे यांचा मोबाईल ब्लॉक करून, बंगला नावावर करण्याचा आणि 5 एकर शेती घेवून देण्याचा आग्रह त्यांचेकडे धरला आणि ते न दिल्यास, गोविंद बर्गे यांच्यावर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली आणि अचानकपणे बोलणे बंद केले. या गोष्टीचा मानसिक त्रास गोविंद बर्गे यांना होवू लागल्याने, त्यांनी वारंवार नर्तिकी पुजा गायकवाड हिला भेटून तसे न करण्याबाबत विनंती केली. परंतु, नर्तिकी पुजा गायकवाड हिने गोविंद बर्गे यांच्याशी बोलण्यास, भेटण्यास नकार दिला.

 

 

 

ही बाब गोविंद बर्गे यांनी त्यांचे मित्राकडे कथन केली आणि सरतेशेवटी नर्तिकी पुजा गायकवाड हिच्या आर्थिक,मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून, दिनांक 09/09/2025 रोजी, सकाळी 8.00 वाजताचे सुमारास, गोविंद बर्गे यांनी पिस्टलने डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली. तदनंतर गोविंद बर्गे यांचा मेव्हणा लक्ष्मण जगन्नाथ चव्हाण यांनी वैराग पोलीस ठाणे येथे नर्तिकी पुजा गायकवाड हिच्या विरुद्ध फिर्याद दिल्यानंतर नर्तिकी पुजा गायकवाड हिच्याविरुद्ध गु.नों.क्र.289/2025, भा.न्या.सं., 2023 चे कलम 108, 351(2) प्रमाणे नोंद होवून, तिला दि.10/09/2025 रोजी पोलीसांनी अटक केली. नर्तिकी पुजा गायकवाड हिचे अटकेनंतर पोलीसांनी तिची पोलीस कोठडी देखील मागितली होती.

 

 

तदनंतर नर्तिकी पुजा गायकवाड हिस न्यायालयीन कोठडी मंजूर झाली आणि तिने जेलमध्ये असताना तिला जामीन मिळावा म्हणून मा. न्यायालयामध्ये जामीनाचा अर्ज दाखल केला होता.

या जामीन अर्जास जिल्हा सरकारी वकिल डॉ. प्रदिपसिंग मो. राजपूत यांनी म्हणणे दाखल करून, तीव्र विरोध नोंदविला आणि युक्तीवाद केला की, सदर नर्तिकी पुजा गायकवाड हिने गोविंद बर्गे यांच्याकडून आर्थिक लुबाडणूक करून, आणि गोविंद बर्गे यांच्याबरोबर प्रेमाचे नाटक करून, त्यांच्याकडून जमीन, प्लॉट, रोख रकमा, सोने-नाणे व महागडे मोबाईल इ. चैनीच्या वस्तूं प्राप्त करून घेतल्या आणि तिच्या लालसा वाढल्यानंतर तिने ती पूर्ण करण्यासाठी गोविंद बर्गे यांचा आर्थिक, मानसिक व शारीरिक छळ केला आणि तिने गोविंद बर्गे यांना त्यांच्या विरुद्ध खोटा बलात्काराचा गुन्हा दाखल करून, बदनामी करण्याची धमकी देवून, त्यांना आत्महत्येस प्रवत्त केल्याने, गोविंद बर्गे यांनी आत्महत्या केल्याचे मा. न्यायालयाचे निदर्शनास आणून दिले.

 

 

त्याचप्रमाणे असा युक्तीवाद केला की, या प्रकरणात जर नर्तिकी पुजा गायकवाड हिला जामीन मंजूर झाल्यास, समाजामध्ये चुकिचा संदेश जावून, नर्तिकी पुजा गायकवाड हिच्यासारख्या महिलांकडून अनेक पुरूषांची आर्थिक, मानसिक व शारीरिक छळ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

 

 

त्यामुळे, नर्तिकी पुजा गायकवाड हिला जामीन देण्यात येवू नये. सदरचा युक्तीवाद ग्राहय धरून, व्ही.एस. मलकलपत्ते-रेडडी, अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश साहेब, बार्शी यांनी नर्तिकी पुजा गायकवाड हिचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

या प्रकरणात जिल्हा सरकारी वकिल डॉ. प्रदिपसिंग मो. राजपूत यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले, तर आरोपीतर्फे अॅङ आर.डी. तारके यांनी काम पाहिले…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button