पालिका आयुक्त डॉ सचिन ओम्बासे यांनी तेजस्विनी महिला उद्योग समूहातील उत्पादित वस्तूंची केले कौतुक….

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर महानगरपालिका सोलापूर केंद्रशासन पुरस्कृत दीनदलाय अंतोदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत तेजस्विनी महिला बचत गट संस्थापिका तथा माजी नगरसेविका मंगलाताई कोल्हे यांच्या वतीने सोलापूर महानगरपालिकेतील आयोजित महिला महोत्सवाच्या बचत गटामध्ये सहभाग नोंदवून बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी तयार केलेल्या वस्तूंचं प्रदर्शन ठेवण्यात आलं.
यावेळी महापालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी तेजस्विनी महिला उद्योग समूहाच्या बचत गटाच्या स्टॉलला भेट दिली यावेळी त्यांनी बचत गटातील महिलांनी साकारलेल्या विविध वस्तूंची पाहणी केली आणि महिलांचे कौतुक देखील केले. यावेळी मोनाली कोल्हे, वंदना जाधव यांच्या हस्ते पालिका आयुक्तांना श्री स्वामी समर्थ महाराज प्रतिमा आणि मानाची शाल घालून सत्कार करण्यात आला. यावेळी कविता चव्हाण, सुरेखा उन्हाळे, पार्थ कोल्हे, मंगेश डोंगरे, वनिता कदम, उषा नायडू, आधी उपस्थित होते
या वेळी तेजस्विनी महिला उद्योग समूहाचे संस्थापक तथा आधारस्तंभ, माजी उपमहापौर, शिवसेनेचे समन्वयक दिलीप कोल्हे यांनी पालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांची भेट घेतली यावेळी त्यांना मानाजी शाल आणि पांडुरंगाची मूर्ती भेट देऊन सत्कार केला. यावेळी दिलीप कोल्हे यांनी बचत गटाच्या माध्यमातून विविध उत्पादित वस्तूंची माहिती दिली यावेळी पालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी तेजस्विनी महिला उद्योग समूहाला भेट देण्याची ग्वाही दिली.
यावेळी संजय शिंदे, शेखर फंड, महेश कुलकर्णी, सचिन खंडागळे, लालू शेठ, नवनाथ थोरात, विकास शिंदे, पार्थ कोल्हे, मंगेश डोंगरे, आदी उपस्थित होते.