crimemaharashtrapoliticalsocialsolapur
तो मी नव्हेच’ म्हणणाऱ्याने काढून दिले लाखोंचे दागिने….

सोलापूर / क्राईम
पोलिसांच्या गस्ती दरम्यान संशियत आरोपी नजर चुकवून जात होता. शहर गुन्हे शाखा पोलिसांनी आरोपीला पकडले असता त्याने पोलिसांची दिशाभूल करीत वेगळेच नाव सांगितले. पोलिसांनी खाक्या दाखविताच शहरातील एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीत घरफोडी केल्याचे कबूल केले.
या आरोपीकडून २१ तोळे सोन्याचे दागिने व २० तोळे चांदीचे दागिने असा एकूण ९ लाख ४८ हजार ३१६ रुपयांचा मुद्देमाल शहर गुन्हे शाखा पोलिसांनी हस्तगत केला आहे.
प्रदिपकुमार रामचंद्र कोळी (कवठे महाकाळ,सांगली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.