educationalindia- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

मराठा मंडळ संचालित छत्रपती शिवाजी महाराज शिक्षण प्रसारक मंडळ निवडणुकीच्या रणधुमाळीतून उमेदवार दामोदर पाटील,ज्ञानेश्वर सपाटे ,रेखा सपाटे ,यांच्यासह ईतर ९ संचालक उमेदवारांनी अर्ज घेतला मागे…

अर्ज मागे घेण्याचा बुधवारी शेवटचा दिवस...

सोलापूर

मराठा मंडळ संचालित छत्रपती शिवाजी महाराज शिक्षण प्रसारक मंडळ निवडणुकी मध्ये चांगलीच रंगत आली असून या शिक्षण संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष माजी महापौर मनोहर सपाटे विरुद्ध ॲड .राम कदम अशी लढत होत असून ही निवडणूक शहर – जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे.

 

 

 

मंगळवारी अध्यक्ष तथा उमेदवार माजी महापौर मनोहर सपाटे यांच्या पॅनल मधील एकूण १२ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले.

 

 

 

यामध्ये विनायक दामोदर पाटील, थोरात नामदेवराव दामोदर, सपाटे ज्ञानेश्वर बबनराव, गवळी महादेव नागनाथ , गायकवाड कुमार दिगंबर ,पवार मधुकर श्रीरंग , भोसले सुनीता तानाजी ,सपाटे रेखा सुरेश ,साळुंखे चेतन सुभाष , गोरे मारुतीराव यशवंत ,शिंदे राजेंद्र भगवान यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली.

 

 

यामध्ये विनायक दामोदर पाटील यांनी खजिनदार व सचिव पदासाठी तरी अन्य उमेदवार यांनी संचालक पदासाठी अर्ज दाखल केला होता. अर्ज मागे घेण्याचा बुधवारी शेवटचा दिवस असून उद्या नेमक्या काय घडामोडी घडणार ? कुणाचे पारडे जड जाणार ? याकडे शिक्षण संस्थेतील सदस्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button