maharashtrapoliticalsocialsolapur

राष्ट्रवादीचै शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क …

सोलापूर

HTML img Tag Simply Easy Learning

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील जी तटकरे साहेब यांच्या आदेशान्वये राज्यात सर्वत्र महायुतीच्या उमेदवारांसाठी एक दिलाने एक संघाने यंदाच्या निवडणुकीत जोरदार प्रचार करण्यात आला.सोलापुरात ही महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार विजयकुमार देशमुख,देवेंद्र कोठे ,आमदार सुभाष देशमुख यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार व त्यांच्या जेष्ठ नेते ,पदाधिकारी ,प्रांतिक सेल अध्यक्ष,कार्याध्यक्ष ,महिला आघाडी यांनी चांगलीच कंबर कसल्याचे यंदाच्या निवडणुकीत प्रथम दर्शनी पाहायला मिळाले .शहर उत्तर मधून माजी पालकमंत्री विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांना शहर उत्तर मधून देवेंद्र कोठे यांना मध्य मधून तर आमदार सुभाष देशमुख यांना दक्षिण मधून प्रचंड मताधिक्य मिळण्यासाठी संतोष भाऊंनी गनीमी कावा करत जोरदार ताकत लावली .त्यामुळे यंदाची निवडणूक विशेष चर्चेची ठरली. अटी -तटीच्या या रंगतदार सामन्यात देखील महायुतीचे उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून येणार आणि पुन्हा एकदा राज्यात महायुतीची सत्ता स्थापन होऊन आमदार विजयकुमार देशमुख येणार्या महायुतीच्या सरकार मध्ये नक्कीच मंत्री होणार असा विश्वास जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार यांनी बुधवारी सहकुटुंब सहपरिवार मतदान केल्यानंतर व्यक्त केला .सर्व समाज घटकांना सोबत घेऊन जाणारे आ.विजयकुमार देशमुख यांनी शहर उत्तर चा कायापालट केला आहे . हे मतदारांना माहिती आहेच .त्यामुळेच मतदार राजा आमदार विजयकुमार देशमुख यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे विजय निश्चित आहे असा विश्वास देखील संतोष भाऊ पवार यांनी यावेळी व्यक्त केला . राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध योजनांच्या माध्यमातून राज्याचा सर्वांगीण विकास केला आहे . त्या विकास कामांच्या जोरावरच राज्यात महायुतीच्या सर्वाधिक जागा मिळतील आणि पुन्हा एकदा सत्ता स्थापन होऊन आपला हक्काचा सरकार पुन्हा एकदा सत्तेवरील मतदार राजांनी आपल्या मतदानाचा हक्क बजवावा व विकास नेतृत्वालाच सर्वाधिक प्राधान्य देऊन विरोधकांची डिपॉझिट जप्त होईल यासाठी मतपेटीतून प्रतीउत्तर द्याव असेही आवाहन संतोष भाऊ पवार यांनी यावेळी केल…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button