crimemaharashtrapoliticalsocialsolapur

ब्रेकींग:- २४ तासाच्या आत चोरीचा गुन्हा उघडकीस एकूण 4,46,000 मुद्देमाल हस्तगत सदर बझार पोलीस ठाण्याची दमदार कामगिरी….

१००% मुद्देमाल हस्तगत....

सोलापूर

 

सदर बझार पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नं.149/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम. 331(3),331(4),305 अन्वये घरफोडीचा गुन्हा दाखल होता. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर बझार पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रगटीकरण पथकातील अंमलदार पोह/525 शहाजहाँन मुलाणी, पोह/548 संतोष पापडे, पोशि/1724 हणमंत पुजारी, पोशि/1119 उमेश चव्हाण, यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे या गुन्ह्याच्या तपासात कोणत्या प्रकारचा पुरावा नसताना लेप्रसी कॉलनी, क्रिडासंकुलच्या मागे, सोलापूर येथे दि.24/02/2025 रोजी 11.40 वा एक इसम हातात पांढऱ्या रंगाची पिशवी घेवुन थांबलेला दिसला त्यांला संशयावरुन ताब्यात घेवून सविस्तर चौकशी केली असता त्याने त्याचे नाव जिबरान ऊर्फ शोएब युन्नुस शेख वय 20 वर्षे रा.मौलाली चौक, केशव नगर, झो. पट्टी असे असल्याचे सांगीतले. त्याच्या ताब्यातील पांढऱ्या पिशवीमध्ये काय आहे ? ते पाहिले असता त्याच्याकडे रोख रक्कम व सोन्याचे दागीने मिळुन आले.

 

 

 

चोरीस गेलेल्या मुददेमाल व त्याच्याकडे मिळालेले सोन्याचे दागीने व याबाबत पडताळणी केली असता त्यामध्ये साम्य मिळून आले आहे, आरोपी नाव जिबरान ऊर्फ शोएब युन्नुस शेख वय 20 वर्षे रा. मौलाली चौक, केशव नगर, झोपडपट्टी यांने दि.23/02/2025 रोजीच्या दुपारी 02.00 ते 03.00 दरम्यान मौलाली चौक, केशव नगर, येथे चोरी केल्याची कबुली गुन्हे प्रगटीकरण पथकातील प्रमुख पोलीस उप निरक्षक नितीन शिंदे यांना दिली. पोलिस उप निरीक्षक शिंदे यांनी गुन्हयाच्या तपासकामी आरोपी जिबरान ऊर्फ शोएब युन्नुस शेख याला दि.24/02/2025 रोजी 12.20 वा अटक केली.

 

 

चोरीस गेलेला १००% मुद्देमाल पोलिसांनी चोरट्याकडून हस्तगत केला .एकूण 4,46,000 रु.मुद्देमाल पोलिसांनी चोरट्याकडून हस्तगत केला.

 

 

 

ही कामगिरी राजकुमार, पोलीस आयुक्त, विजय कबाडे, पोलीस उपआयुक्त परिमंडळ, यशवंत गवारे सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग-2, अजित लकडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, शभालचंद्र ढवळे पोलीस निरीक्षक (गुन्हे), यांच्या मार्गदर्शनाखाली, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उप निरीक्षक नितीन शिंदे, सहा.फो/ औदुंबर आटोळे, पोहेकों संतोष पापडे, पोहेको शहाजहान मुलाणी, पोहेकों/सागर सरतापे, पोहेको / राजेश चव्हाण, पोको सागर गुंड, अनमोल लट्टे, उमेश चव्हाण, हणमंत पुजारी, सोमनाथ सुरवसे, यांनी यशस्वी पणे पार पाडली….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button