crimemaharashtrapoliticalsocialsolapur

खाकी वर्दीच्या पोटच्या गोळ्याच्या न्यायासाठी पोलिस अधीक्षकांकडे धाव

नेमके प्रकरण काय?...वृत्त सविस्तर

सोलापूर

यात थोडक्यात हकीकत अशी की,यातील विजय विश्वनाथ माने हे महामार्ग पोलिस ठाण्यात ASI पदावर कार्यरत आहेत.त्यांचा मुलगा स्व.यशराज विजय माने वय २१ वर्षे हा BSC नर्सिंग च्या दुसऱ्या वर्षात लाईफ लाइन नर्सिंग कॉलेज कुर्टी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर हा दिनांक १/०३/२०२५ रोजी दुपारी २:३० वा.सुमारास आपल्या मित्रांसमवेत पद्मावती जलतरण तलाव पंढरपूर येथे पोहायला जातो असे सांगून निघून गेला . यानंतर दुपारी ४:३० वा.सुमारास यशराज चा मित्र प्रवीण दहिफळे याने यशराज च्या कुटुंबियांना फोन करून यशराज हा जलतरण तलावात पोहत असताना पाण्यात बुडाला असून त्याला उपचारासाठी लाईफ लाईन हॉस्पिटल पंढरपूर येथे दाखल करण्यात आले आहे.तुम्ही तत्काळ हॉस्पिटल मध्ये या असे कळविताच यशराज कुटुंबीयांनी हॉस्पिटल मध्ये धाव घेतली . कुटुंबीय हॉस्पिटल मध्ये पोहोचण्या पूर्वीच यशराज हा उपचारापूर्वीच मृत झाल्याचे डॉक्टरांनी यशराज च्या नातेवाईकांना सांगितले.एकूणता एक मुलगा आपल्याला सोडून काळाच्या पडद्याआड गेला ही वार्ताच पायाखालची वाळू सरकवणारी होती.नातेवाईकांनी घटनेनंतर हॉस्पिटल मध्येच टाहो फोडला. ज्या जलतरण तलावावर यशराज चा मृत्यू झाला .तेथे कोणतीही सेवा – सुविधा नसल्याने आपल्या मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. नातेवाईकांच्या तक्रारी नंतर पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात संबंधित दोषींवर भारतीय न्याय संहिता कलम BNS १९४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. याचा तपास पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी पाटील हे घटनेचा पुढील तपास करत आहे . यानंतर शोकाकुल वातावरणात यशराज वर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या या निधनाबद्दल आई – वडील नातेवाईक ,मित्रांनी , नर्सिंग कॉलेज मधील शिक्षक , मित्र मंडळींनी शोक व्यक्त केला .
या प्रकरणात यशराज च्या मृत्य कारणीभूत हलगर्जीपणा करणारे तलावाचे ठेकेदार , नगर पालिका यांच्यावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी यशराज च्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे . सदर प्रकरणात पंढरपूर शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी तपासात संथ गतीने तपास करत असल्याने बुधवारी यशराज च्या नातेवाईकांनी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची समक्ष भेट घेऊन कायद्याचे रक्षण करणाऱ्या ASI च्या मुलालाच न्याय मिळेना तर सर्वसामान्यांना पोलिस प्रशासन काय न्याय देणार ? “पोलिस अधीक्षक साहेब” यशराज च्या मृत्यस कारणीभूत दोषींवर तत्काळ मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा.कुटुंबियांना न्याय मिळवून द्या अशी आग्रही विनंती यशराज च्या कुटुंबियांनी पोलिस अधीक्षकांकडे केली लेखी निवेदना द्वारे केली.
हे निवेदन देतेवेळी यशराज चे वडील ASI विजय माने , सामाजिक कार्यकर्ते शिवराज गायकवाड, शशिकांत जाधव , नवनाथ जाधव ,अनिल माने, स्वप्नील जाधव व माने कुटुंबियातील सदस्यांची उपस्थिती होती….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button