crimemaharashtrapoliticalsocialsolapur

घरकुलाच्या शेवटच्या हप्त्यासाठी १२ हजारांची लाच; उंबरगावचे ग्रामपंचायत अधिकारी व शिपाई एसीबीच्या जाळ्यात ; पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया…

 

सोलापूर : प्रतिनिधी

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मंजूर घरकुलाच्या शेवटच्या हप्त्यासाठी लाभार्थ्याकडून लाच मागितल्याप्रकरणी उंबरगाव (ता. पंढरपूर) येथील ग्रामपंचायत अधिकारी आणि शिपाई यांना सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा रचून पकडले. या कारवाईत ग्रामपंचायत शिपाई दत्तात्रय अभिमान कांबळे यांनी तक्रारदाराकडून १२ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.
या प्रकरणातील आरोपींमध्ये प्रशांत प्रकाश मुकरे (वय ४५), ग्रामपंचायत अधिकारी उंबरगाव, पंचायत समिती पंढरपूर तसेच दत्तात्रय अभिमान कांबळे (वय ४५), ग्रामपंचायत शिपाई उंबरगाव यांचा समावेश आहे. या दोघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये कलम ७, ७-अ व १२ अंतर्गत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाण्यात सुरू आहे.
एसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांना पंतप्रधान आवास योजनेतून घरकुल मंजूर झाले होते.

 

 

 

 

 

या योजनेअंतर्गत १ लाख २० हजार रुपये अनुदान मंजूर झाले होते. मात्र घरकुलाचा शेवटचा हप्ता देण्यासाठी आरोपींनी तक्रारदाराकडे २० हजार रुपयांची लाच मागितली होती.
दि. १३ मार्च २०२६ रोजी पडताळणी कारवाईदरम्यान ग्रामपंचायत शिपाई दत्तात्रय कांबळे यांनी स्वतःसाठी तसेच ग्रामपंचायत अधिकारी प्रशांत मुकरे यांच्यासाठी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तडजोडीनंतर १२ हजार रुपये देण्याचे ठरले.यानंतर दि. १६ मार्च २०२६ रोजी एसीबीच्या पथकाने सापळा रचला असता ग्रामपंचायत शिपाई दत्तात्रय कांबळे यांनी तक्रारदाराकडून १२ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.

 

 

 

 

ही कारवाई एसीबी पुणे परिक्षेत्राचे पोलीस उपायुक्त / पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील तसेच पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस निरीक्षक रविंद्र लांभाते, पोलीस निरीक्षक शैलेश पवार तसेच एसीबी सोलापूरच्या पथकातील अधिकारी व कर्मचारी सहभागी होते.

कोट :
“शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांनी कोणतेही काम करून देण्यासाठी कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी घाबरून न जाता तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा. अशा प्रकरणांमध्ये एसीबीकडून कठोर कारवाई करण्यात येते.”
प्रशांत चौगुले, पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia