maharashtrapoliticalsocialsolapur

विजयपूर जिल्ह्यातील सौहार्द सहकारी संस्थांसाठी विषयाधारित प्रशिक्षण कार्यक्रम…

विजयपूर / दिपक शिंत्रे

विजयपूर

 

 

कर्नाटक राज्य सौहार्द संयुक्त सहकारी संस्था, बेंगळुरू यांच्या वतीने विजयपूर जिल्ह्यात दावा दाखल व लेखी कागदपत्रांच्या अंतिम पूर्ततेसंदर्भात विषयाधारित प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन सोलापूर रोडवरील शांतेश्वर सहकारी संघाच्या सभागृहात संपन्न झाला.
या कार्यक्रमात बेळगाव येथील चार्टर्ड अकाउंटंट महांतेश होसपेटे तसेच राचय्या हिरेमठ यांनी उद्घाटन समारंभानंतर मार्गदर्शन केले.

 

 

 

कार्यक्रमाचे उद्घाटन अमरनाथ बिरादार यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी सौहार्द संयुक्त सहकारी संस्थेचे संचालक संजय पाटील कनमडी होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सौहार्द संस्थांची कार्यपद्धती, बांधिलकी व जबाबदाऱ्या याविषयी सविस्तर माहिती दिली.

 

 

प्रमुख पाहुणे म्हणून सहकार भारतीचे जिल्हा संघटना सचिव दीपक शिंत्रे उपस्थित होते. तसेच सौहार्द संयुक्त सहकारी संस्थेचे जिल्हा अधिकारी बसवराज यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सौ. प्रतिभा मठ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले
या अर्थपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रमात विजयपूर जिल्ह्यातील विविध सौहार्द सहकारी संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button