maharashtrapoliticalsocialsolapur

गीत स्वरांजली, भावगीत व भक्तीगीतांचा बहारदार कार्यक्रम संपन्न…

विजयपूर / दिपक शिंत्रे

 

विजयपूर :
अधिक महिन्यानिमित्त भावसार क्षत्रिय समाज यांच्या वतीने गीत स्वरांजली, भावगीत, भक्तीगीत तसेच बहारदार मराठी, व हिंदी गीतांचा रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रम भावसार सांस्कृतिक भवनात उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमास समाजातील महिला, युवक व ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती होते.

 

 

 

 

कार्यक्रमात गीत स्वरांजलचे ऑर्गनायझर नरेश वंजाळे, गायक अनिल लोंढे, गायिका सायली साठे, कीबोर्ड अमीर हुंडेकरी, ढोलक ढोलकी महादेव तेली, पॅड वादक अभिषेक दनाने व साऊंड सिस्टम गोपाळ शिंदे यांच्यासह विविध कलाकारांनी मराठी, हिंदी भाषेतील लोकप्रिय गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली. भक्तीगीतांनी कार्यक्रमाला आध्यात्मिक रंग चढविला, तर भावगीत आणि सुगम संगीतामुळे वातावरण आनंदमय झाले. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात कलाकारांना उत्स्फूर्त दाद दिली.

 

 

 

अधिक महिन्याचे औचित्य साधून समाजातील महिलांना वाण वाटप करण्यात आले. महिलांनी या उपक्रमाचे स्वागत करत आयोजकांचे आभार मानले. समाजातील एकोपा, सांस्कृतिक जपणूक आणि धार्मिक परंपरा जतन करण्यासाठी अशा कार्यक्रमांची आवश्यकता असल्याचे मत यावेळी समाजाचे अध्यक्ष राजेश देवगिरी यांनी व्यक्त केले.

 

 

 

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समाजाच्या पंच मंडळाचे पदाधिकाऱ्यांनी महिला मंडळाचे अध्यक्षा सौ नंदा पुकाळे, सचिव सौ. राजेश्री हिरासकर, युवक समितीचे अध्यक्ष नितीन मिरजकर, तरुण संघाचे अध्यक्ष विनायक कुंटे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button