maharashtrapoliticalsocialsolapur

ढोल-ताशांच्या गजरात शिवराज्याभिषेक दिन साजरा; शिवस्मारकावर शिवभक्तांचा उत्स्फूर्त जल्लोष…

 

सोलापूर :

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५२ व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सुवर्ण गणपती युवक प्रतिष्ठान, हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान आणि छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शिवस्मारक येथे भव्य आणि उत्साहपूर्ण राज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात आणि शिवगर्जनांनी परिसर दुमदुमून गेला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित मूर्तीचा विधिवत राज्याभिषेक करण्यात आला. त्यानंतर महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त उपस्थितांना मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या धार्मिक विधीचे पौरोहित्य किरण जोशी यांनी केले.

 

 

 

या सोहळ्यास राज्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, खासदार धैर्यशील माने, खासदार डॉ. ज्योती वाघमारे, आमदार विजयकुमार देशमुख, महापौर विनायक कोंड्याल, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समितीच्या सभापती रंजिता चाकोते, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांच्यासह विविध राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.

यावेळी अमोल जोशी, रोहिणी तडवळकर, अमोल शिंदे, दास शेळके, प्रताप चव्हाण, विनोद भोसले, प्रियदर्शन साठे, गुरुशांत धुत्तरगावकर, ज्ञानेश्वर सपाटे, श्रीकांत घाडगे, बाळासाहेब गायकवाड, अंबादास गोरंटला, रवी गोणे, आनंद मुसळे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

 

 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची, दूरदृष्टीची आणि लोककल्याणकारी राज्यकारभाराची आठवण करून देणारा हा सोहळा शिवभक्तांसाठी प्रेरणादायी ठरला. शिवरायांच्या विचारांचा जागर आणि हिंदवी स्वराज्याच्या मूल्यांचा प्रचार-प्रसार करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button