सुवर्ण गणपती युवक प्रतिष्ठानतर्फे शिवगौरव पुरस्काराचे थाटात वितरण

सोलापूर : प्रतिनिधी
सुवर्ण गणपती युवक प्रतिष्ठान हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान आणि छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा समिती यांच्यातर्फे शनिवारी शिवगौरव पुरस्कारांचे वितरण थाटात करण्यात आले.
शिवस्मारक येथे झालेल्या कार्यक्रमात पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते तसेच सोलापूर महानगरपालिकेचे महापौर विनायक कोंड्याल, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य यांच्या प्रमुख उपस्थितीत रुद्रशक्ती गुरुकुल मर्दानी खेळ प्रशिक्षण केंद्राचे मुख्य प्रशिक्षक विवेक मिस्कीन, प्रशिक्षिका सोनाक्षी माडे, साक्षी कानगुडे श्रद्धा सरवदे, जान्हवी म्हेत्रे, बिंदूप्रिया कुने यांना शिवगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, नगरसेवक विनोद भोसले, श्रीकांत घाडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी सुवर्ण गणपती युवक प्रतिष्ठानचे उत्सव अध्यक्ष हर्षद कुलकर्णी, अमृत हावळे, पार्थ गायकवाड आदी उपस्थित होते.



