maharashtrapoliticalsocialsolapur

ऊस कारखान्यातील कोट्यवधींच्या फसवणुकीवर डिजिटल उपाय : गँगमेन टेक्नॉलॉजीजचा दावा वाहतुकदार: मुकादम आणि तोडणी कामगारांच्या व्यवहारात पारदर्शकता आणणारे स्मार्ट सॉफ्टवेअर चर्चेत….

सोलापूर

ऊस उद्योगातील वाहतूकदार, मुकादम आणि ऊसतोडणी कामगारांकडून होणारी आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी बीडस्थित गँगमेन टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने एक स्मार्ट डिजिटल सोल्युशन विकसित केल्याचा दावा केला आहे.या तंत्रज्ञानामुळे साखर कारखान्यांची दरवर्षी ५ ते ६ कोटी रुपयांपर्यंत बचत होऊ शकते, असा दावा कंपनीचे सीईओ महादेव मुरकुटे यांनी केला आहे.

 

 

 

 

गँगमेन टेक्नॉलॉजीजने सोलापुरात हॉटेल द फर्न येथे पत्रकार परिषद घेत साखर कारखान्यांची होणारी फसवणूक आणि नुकसानीची माहिती दिली.या पत्रकार परिषदेस अक्कलकोटच्या वनिता खेडगी यांची प्रमुख उपस्तिती होती.

साखर उद्योगात ऊसतोडणी कामगार, मुकादम, वाहतूकदार आणि गटप्रमुख यांच्या स्तरावर होणाऱ्या गैरव्यवहारांमुळे कारखान्यांना मोठा आर्थिक फटका बसतो.अनेक कारखान्यांमध्ये प्रतिवर्षी ३ ते ५ कोटी रुपयांपर्यंत फसवणूक होत असल्याचा अंदाज कंपनीने व्यक्त केला आहे.

 

 

 

 

याशिवाय लेबर चेकिंगसाठी स्वतंत्र पथके, स्लिप प्रिंटिंगचा खर्च आणि पारंपरिक व्यवस्थापनातील त्रुटींमुळे कारखान्यांचा खर्च वाढत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

गँगमेन टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या म्हणण्यानुसार, विकसित करण्यात आलेल्या स्मार्ट सॉफ्टवेअर आणि मोबाईल ॲपच्या माध्यमातून प्रत्येक ऊसतोडणी मजूर, मुकादम आणि वाहतूकदारांची डिजिटल नोंद ठेवली जाईल.आधार पडताळणी आणि डिजिटल ट्रॅकिंगमुळे बनावट नोंदी, मजुरांची संख्या वाढवून दाखवणे आणि इतर प्रकारच्या फसवणुकींना आळा बसू शकतो.

 

 

 

या प्रणालीमुळे प्रशासनिक खर्चात ३० टक्क्यांपर्यंत बचत होण्याबरोबरच कारखान्यांना अतिरिक्त मजूर भरतीची गरजही कमी होईल, असा दावा कंपनीने केला आहे.

गँगमेन टेक्नॉलॉजीजने साखर कारखानदारांना हे सॉफ्टवेअर वापरण्याचे आवाहन केले असून, चालू हंगामातील वाहतूकदार, मुकादम आणि कामगारांची नोंद त्यांच्या ॲपवर करण्याची विनंती केली आहे.

 

 

 

साखर उद्योगातील पारदर्शकता आणि खर्च नियंत्रणासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढत असताना गँगमेन टेक्नॉलॉजीजच्या या दाव्याकडे साखर कारखानदारांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button