maharashtraindia- worldpoliticalsocialsolapur

परराज्यातुन अंमलीपदार्थ गांजा आणुन विक्री करण्याची तयारीत असलेले तीन आरोपी जेरबंद एकुण 36 किलो 270 ग्रॅम असा एकुण 7,55,400 रु किमतीचा गांजा हस्तगत

स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीणची कामगिरी

 

सोलापूर

 

पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण अतुल कुलकर्णी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ट पोलीस निरीक्षक  संजय जगताप यांना सोलापूर ग्रामीण जिल्हयामध्ये अंमली पदार्थ गांजा ची वाहतुक व विक्री करणाज्यांची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करणेबाबत आदेशित केले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप* यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील दुय्यम अधिकारी व अंमलदार यांना *अवैध अंमली पदार्थ विक्री* व वाहतूकीबाबत माहिती काढून कारवाई करणेबाबत सुचना दिल्या होत्या. सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ व त्यांचे पथकास अंमली पदार्थ गांजा व ड्रग ची वाहतुक व विक्री करण्यारे इसमांवरती कारवाई करण्याच्या सुचना दिल्या होत्या.
सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानदेव वाघ व त्यांचे पथक हे सोलापुर तालुका ठाणे आवारातील स्थानिक गुन्हे शाखेचे कार्यालयात हजर असताना, त्यांच्या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल मोहन मनसावाले यांना त्यांचे गोपणीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली कि, इसम नामे सचिन बनसोडे व एकनाथ लेंडवे हे दोघे जगदलपुर, राज्य छत्तीसगड येथुन अंमली पदार्थ गांजा याची वाहतूक करुन विक्री करण्याकरीता सोलापुर पोलीस ठाणे हददीतील बोरामणी गावचे हददीत हैद्राबाद सोलापुर रोडवरील मौजे बोरामणी शिवारातील असलेल्या हॉटेल वैष्णवी जवळ येणार असल्याबाबत खात्रीशीर गोपनीय बातमी मिळाली.

 

 

ही  माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांना दिल्यानंतर त्यांनी, एन.डी.पी.एस कायदयातील तरतुदीनुसार कारवाई करणेकरीता वरिष्ठांची परवानगी घेवून वर नमूद बातमी प्रमाणे सापळा कारवाई करणेकरीता गेले. मिळालेल्या बातमी प्रमाणे, वर नमूद ठिकाणी सापळा लावून नमूद इसमांचा शोध घेत असताना, हॉटेल वैष्णवी समोरील डांबरी रस्त्याच्या बाजूस रोडलगत दोन इसम, सोबत दोन मोठया बॅगासह उभे असल्याचे दिसले. त्यांचा बातमी प्रमाणे संशय आल्याने, त्यांना जागीच पकडले. पकडलेल्या इसमांना नांव व पत्ता विचारता त्यांनी त्यांची नांवे, 1) सचिन लक्ष्मण बनसोडे, वय 39 वर्षे, रा. टाकळी सिकंदर, ता. मोहोळ जि. सोलापूर, 2) एकनाथ नामदेव लेंढवे, वय 33 वर्षे, रा. मेथवडे, ता. सांगोला जि.सोलापूर असे असल्याचे सांगितले. तेंव्हा त्यांचे ताब्यात मिळून आलेल्या दोन्ही बॅगांची तपासणी केली असता, त्यामध्ये निळयारंगाच्या 02 प्लास्टिकच्या पिशवीमध्ये एकूण 36 किलो 270 ग्रॅम वजानाचा अंमली पदार्थ गांजा, एकूण 7,25,400 रु. किंमतीचा अंमली पदार्थ गांजा व 30,000/- रु. किंमतीचे दोन मोबाईल असा एकूण 7,55,400/- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

 

 

पकडलेल्या इसमांकडे मिळून आलेल्या अंमली पदार्थ गांजा बाबत विचारपूस करता त्या दोघांनी सांगितले की, सदरचा अंमली पदार्थ गांजा हा जगदलपूर राज्य छत्तीसगड येथून विकत आणला असून तो अंमली पदार्थ गांजा इसम नामे 3) अनिल लक्ष्मण रोंगे, रा. खर्डी, पंढरपूर, ता. पंढरपूर जि. सोलापूर यास विक्री करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर अनिल रोंगे याची माहिती काढून त्यासही सदर गुन्हयाचेकामी मोहोळ येथून ताब्यात घेवून अटक करण्यात आली आहे.

 

 

तरी वरील तीन्ही आरोपीतांविरुध्द पोलिस हेड कॉन्स्टेबल मोहन मनसावाले यांनी फिर्याद दिल्याने, सोलापूर तालुका पोलीस ठाणे गुरनं 318/2026 गुंगीकारक औषध द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनिमय 1985 चे कलम 8(क), 20(ब) ii(क), 29 चे अन्वये* गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि ज्ञानदेव वाघ स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण हे करीत आहे. अटक आरोपीनां मा. न्यायालयात हजर केले असता त्यांना दिनांक 09/06/2026 रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळाली आहे.

ही  कामगिरी मा. पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. वियज कबाडे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संजय जगताप यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि ज्ञानदेव वाघ, सपोनि भिमगोंडा पाटील, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर, सफौ/ नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले, हरिदास पांढरे, अनिश शेख, अश्विनी गोटे, अक्षय डोंगरे, चालक सतिष बुरकुल यांनी बजावली आहे.
—- 000 —-

सोलापूर तालुका पोलीस ठाणे गुरनं 318/2026 गुंगीकारक औषध द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनिमय 1985 चे कलम 8(क), 20(ब) ii(क), 29 चे अन्वये दाखल गुन्हयातील अटक आरोपी नांवे –

1) सचिन लक्ष्मण बनसोडे, वय 39 वर्षे, रा. टाकळी सिकंदर, ता. मोहोळ जि. सोलापूर

2) एकनाथ नामदेव लेंढवे, वय 33 वर्षे, रा. मेथवडे, ता. सांगोला जि.सोलापूर

3) अनिल लक्ष्मण रोंगे, रा. खर्डी, पंढरपूर, ता. पंढरपूर जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button