india- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

बकरी ईद पार्श्वभूमीवर शहरात फौजदार चावडी पोलिसांचा भव्य रूट मार्च; नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन…

 

सोलापूर, दि. २६ मे :

आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी यासाठी मंगळवारी सायंकाळी फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या वतीने भव्य रूट मार्च काढण्यात आला. सायंकाळी ७.१५ ते ७.४० या वेळेत हा रूट मार्च पार पडला.

 

 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या रूट मार्चमध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा सहभागी झाला होता. शहरातील संवेदनशील तसेच गर्दीच्या भागातून हा मार्च काढण्यात आला. खाटीक मशीद येथून रूट मार्चला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर दत्त चौक, बावाकादरी मशीद, मल्लिकार्जुन मंदिर, गवंडी गल्ली, पंजाब तालीम मशीद, मंगळवेढा तालीम, चौपाड, नामदेव चिवडा मार्गे पुन्हा दत्त चौक येथे रूट मार्चची सांगता करण्यात आली.

 

 

रूट मार्चदरम्यान पोलिसांनी परिसरात पाहणी करत नागरिकांशी संवाद साधला. सणाच्या काळात अफवांवर विश्वास न ठेवता शांतता आणि सामाजिक सलोखा राखावा, कोणतीही संशयास्पद घटना निदर्शनास आल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले.

 

या रूट मार्चमध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त , पोनी १, सपोनी/पोसई ४, एसआरपीचे २३ जवान, आरसीपीचे ११ कर्मचारी, ६५ पोलीस अंमलदार तसेच ३५ होमगार्ड जवान सहभागी झाले होते. पोलिसांच्या या उपस्थितीमुळे परिसरात सुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले होते.

बकरी ईद सण शांततेत, उत्साहात आणि कोणताही अनुचित प्रकार न घडता पार पडावा यासाठी पोलिस प्रशासन पूर्णपणे सतर्क असून संवेदनशील भागांमध्ये विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरातील प्रमुख चौक, धार्मिक स्थळे तसेच गर्दीच्या भागांमध्ये पोलिसांची गस्त वाढविण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button