india- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

हिंदू मुलींनी आचरणातून बाळगावा संस्कृतीचा अभिमान

शिवचरित्र व्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे : श्री नवदुर्गा माता मंदिरात अधिक मासानिमित्त व्याख्यान

 

सोलापूर : प्रतिनिधी

संपत्तीच्या मोहापाई आपण संस्कार विसरत चाललो आहोत. धर्म आणि देशाच्या उज्वल भवितव्यासाठी हिंदू मुलींनी आचरणातून आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगावा, असे प्रतिपादन शिवचरित्र व्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे यांनी केले.

जोडभावी पेठेतील जय भारत समाजसेवा नवरात्र महोत्सव मंडळ श्री नवदुर्गा माता मंदिरातर्फे अधिक मासानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांतर्गत सोमवारी शिवचरित्र व्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे यांचे धर्म संस्कृती व आजची स्त्री या विषयावर व्याख्यान झाले.

 

 

 

 

 

भारतीय संस्कृती हिंदुस्थानातील शूर, पराक्रमी आणि संस्कारी महिलांचा इतिहास सांगतानाच डॉ. शिवरत्न शेटे यांनी सद्यस्थितीचे वर्णन करत महिला आणि पुरुष वर्गाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले. डॉ. शेटे म्हणाले, राजमाता जिजाऊ, अहिल्यादेवी होळकर, कित्तूर राणी चन्नम्मा, केळवी राणी चन्नम्मा, बेळवडी मल्लम्मा अशा अनेक थोर भारतीय महिलांनी समाजाचे रक्षण करत समाजाला धीर दिला आहे. भारतीय स्त्री कधीच अबला नव्हती. प्रेमळ स्त्री जेव्हा रणचंडीकेचे रूप धारण करते तेव्हा ती शत्रूची मुंडकी उडवायलाही कचरत नाही हा भारताचा इतिहास आहे. आपण इतिहास विसरलो तर समाजाचे भविष्य धोक्यात येईल, असेही शिवचरित्र व्याख्याते डॉ. शेटे यांनी सांगितले.

 

 

 

 

जय किंवा पराजय होत राहतो. पण लढण्याची वृत्ती न सोडवण्याची शिकवण भारतीय स्त्रियांनी दिली आहे. आपली संस्कृती सेवेची आहे, वृद्धाश्रमाची नाही. हिंदू मुलींनी केरळ स्टोरी सारखे चित्रपट आवर्जून पहावेत आणि इतर मुलींनाही दाखवावेत. परधर्मीयांशी विवाह करण्यासाठी पळून जाणे अत्यंत अयोग्य असल्याचेही डॉ. शेटे यांनी याप्रसंगी सांगितले.

याप्रसंगी मंडळाचे आधारस्तंभ सिद्धेश्वरन नाडार, संजय होमकर, भीमाशंकर पद्मगोंडा,उमेश उळागड्डे, नागेश होंड्राव,बाळासाहेब वाघमोडे, नरेंद्र होमकर, चंद्रकांत कलशेट्टी, रमेश उळागड्डे, नारायण सुरवसे, रमेश धनुरे,गुरुराज पदमगोंडा, ऋतुराज वाघमोडे, संकेत अल्लोळी आदी उपस्थित होते.

 

 

 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुलोचना हवले, महानंदा कलशेट्टी, सुमन बुद्धे, वनजा नाडार, पुनम होमकर, अनिता वाघमोडे, महानंदा अल्लोळी, राजश्री हवले, माधुरी बुद्धे, शैलजा बुद्धे, लक्ष्मी गावडे, आरती पद्मगोंडा आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर अतनूरे यांनी केले.
——–
चौकट

डॉ. शिवरत्न शेटे यांच्यासह उपस्थितांच्या डोळ्यांतूनही अश्रू

डॉ. शिवरत्न शेटे यांनी आई, वडील, सासू, सासरे यांना अनेक कुटुंबात देण्यात येणारी तुच्छतेची वागणूक सांगत अशा मानसिकतेवर ताशेरे ओढले. आई वडील, सासू-सासरे यांची सेवा याला आपले सर्वोच्च प्राधान्य असायला हवे, असे त्यांनी सांगितले. समाजात घडणारे चांगले वाईट प्रसंग सांगताना डॉ. शिवरत्न शेटे यांच्यासह उपस्थितांच्या डोळ्यांमधूनही अश्रू आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button