crimemaharashtrapoliticalsocialsolapur

कायदेशीर देणे रकमेपेक्षा जास्त रकमेचा चेक बाउंस झाल्यास गुन्हा नाही, कर्जदाराची वीस वर्षानंतर निर्दोष मुक्तता…

सोलापूर

HTML img Tag Simply Easy Learning

 

कर्जाच्या देणे रकमेपेक्षा जास्त रकमेचा धनादेश कर्जदाराकडून घेऊन तो धनादेश अनादरीत अर्थात बाउन्स झाल्यास कर्जदार आरोपीस शिक्षा देता येणार नसल्याचा महत्वपूर्ण निष्कर्ष प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती पी.डी.चव्हाण यांनी निकालपत्रातून नोंदवत कर्जदार आरोपी विजय विठ्ठल होमकर (रा. भवानी पेठ, सोलापूर ) याची निर्दोष मुक्तता केली.
याची हकीगत अशी की, आरोपी विजय विठ्ठल होमकर यांनी सोलापूर येथील ललितराज नागरी सहकारी पतसंस्थेतून सन २००१ मध्ये कर्ज घेतले होते. त्या कर्जाच्या देणे असलेल्या रकमेकरिता होमकर यांनी पतसंस्थेस दिलेल्या रक्कम रु. ३०,२८५/- चा दि. २९/११/२००५ चा धनादेश आरोपीने त्याचे जनता सहकारी बँक, शेळगी शाखेतील खातेच बंद केल्याच्या कारणावरून न वटता पतसंस्थेस परत आला. त्यानंतर पतसंस्थेने कायदेशीर नोटीस देऊनही आरोपी होमकर यांनी चेकची रक्कम पतसंस्थेस दिली नाही. त्यामुळे ललितराज नागरी सहकारी पतसंस्थेचे तत्कालीन चेअरमन दिलीप पतंगे यांनी आरोपीविरुद्ध थेट न्यायालयात २०/०१/२००६ रोजी फिर्याद देऊन आरोपी होमकर यांनी धनादेश देऊन तो न वटविता पतसंस्थेची फसवणूक केल्याचा आरोप केला होता. या खटल्याचा न्यायालयात निकाल होण्यास तब्बल २० वर्षे, २ महिने, २६ दिवस लागले.

 

 

आरोपीने देणे असलेल्या कर्जाची रक्कम पाहता धनादेशावरील रक्कम जास्त असल्यामुळे आरोपीने त्याच्या कायदेशीर देण्यापोटी धनादेश दिला असल्याचे सिद्ध होत नाही. त्यामुळे आरोपी विरुद्ध गुन्हा शाबीत होत नसल्याचा युक्तिवाद आरोपीचे वकील आल्हाद अंदोरे यांनी केला.

 

 

 

तो युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायाधीशांनी आरोपीची निर्दोष मुक्तता केली.
या खटल्यात आरोपीचा बचाव अ‍ॅड.आल्हाद अंदोरे, अ‍ॅड.अथर्व अंदोरे, अ‍ॅड.सुयश पुळूजकर यांनी केला. तर फिर्यादी पतसंस्थेच्या वतीने अ‍ॅड.आजमोद्दीन शेख यांनी काम पाहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button