हिंदवी स्वराज्याच्या धर्मवीराला अभिवादन; शिवभक्तांच्या उपस्थितीत जयंती सोहळा संपन्न

सोलापूर :
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ यांच्या वतीने मध्यवर्ती महामंडळ कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या पराक्रम, राष्ट्रनिष्ठा आणि हिंदवी स्वराज्यासाठी दिलेल्या बलिदानाचे स्मरण करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. नगरसेवक माननीय मनीष केत यांच्या शुभहस्ते महाराजांच्या मूर्तीला हार अर्पण करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी “जय शंभूराजे” च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

कार्यक्रमात बोलताना मान्यवरांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे शौर्य, त्याग, धर्मरक्षणासाठी दिलेले योगदान आणि स्वराज्याप्रती असलेली निष्ठा यांचा गौरव केला. युवकांनी महाराजांच्या विचारांवर चालत समाजहितासाठी कार्य करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
या प्रसंगी उत्सव अध्यक्ष पद्माकर नाना काळे, उत्सव कार्याध्यक्ष जयवंत सलगर, उत्तराताई बर्डे, प्रीतम परदेशी, अंबादास शेळके, बजरंग जाधव, महादेव गवळी, प्रकाश ननवरे, ब्रह्मदेव पवार, सुभाष पवार, बापू जाधव, प्रशांत पाटील, सदाशिव पवार, विश्वनाथ गायकवाड, विजू भोसले, राम माने, लिंबाजी जाधव, नागेश वडणे, बाबा बनसोडे, माऊली बजरंगी, सचिन स्वामी, देविदास घुले, हनुमंत पवार, दादा सुरवसे, गोवर्धन गुंड, परशुराम पवार, सचिन चव्हाण, अंबादास सपकाळ, विनायक ताकभाते, रमेश जाधव, बसवराज कोळी, प्रदीप कळम आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरात विविध ठिकाणी अभिवादनाचे कार्यक्रम, मिरवणुका आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या कार्यक्रमास शिवभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला…

रणधुरंदर, शूर पराक्रमी, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तमाम सोलापूर शहर – जिल्हा वासियांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा…
शुभेच्छुक:- ॲड.अरविंद आंदोरे, ॲड, आल्हाद आंदोरे, ॲड. अथर्व आंदोरे



