crimemaharashtrapoliticalsocialsolapur

भोंदूबाबा अशोक खरात व त्यांचे पत्नीने फसवणूक केल्याप्रकरणी सोलापूर पोलीस अधीक्षक यांचेकडे तक्रार दाखल….

सोलापूर

 

कळमण तालुका उत्तर सोलापूर येथील शेतकरी राजाराम रामचंद्र बनसोडे यांनी छावा संघटनेचे अॅड. योगेश नागनाथ पवार यांच्यामार्फत आज पोलीस अधीक्षक, सोलापूर यांच्याकडे भोंदूबाबा अशोक खरात व त्यांचे पत्नी व अन्य व्यक्तींविरुद्ध फौजदारी तक्रार दाखल केली आहे. सोलापूर पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन सर्व आरोपींवर तात्काळ कठोर कारवाई करावी, अन्यथा छावा संघटनेच्यावतीने मोठे आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा छावाचे अॅड. योगेश पवार यांनी दिला आहे.

 

 

 

याबाबत सविस्तर हकीकत अशी की, तक्रारदार राजाराम बनसोडे हे गट क्र. २००/१ मधील ११ एकर ०८ गुंठे शेतजमिनीचे मूळ मालक आहेत. भोंदूबाबा अशोक खरात यांची ब्लॅक मनी व्हाइट करणारे नरखेड (तालुका मोहोळ) येथील शुक्राचार्य मारुती कोल्हाळ व रणजित ब्रम्हचारी कोल्हाळ यांनी दीड कोटी रुपयांचे आश्वासन देऊन नोव्हेंबर २०२१ मध्ये सदर जमीन भोंदूबाबा अशोक खरात यांचेसाठी अवघ्या ५० लाख रुपयांत खरेदी केली. व उर्वरित १ कोटी रुपये सदरील जमीन शोक खरात यांचे नांवावर झाल्यावर देतो, असे संगितले. परंतु, जमीन नावे झाल्यावरही अशोक खरात व कोल्हाळ यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली.

 

 

 

 

मार्च २०२४ मध्ये रणजित कोल्हाळ याने हीच जमीन अशोककुमार एकनाथ खरात व कल्पना खरात यांना तब्बल २ कोटी ४० लाख ९१ हजार २०० रुपयांत विकली. खरेदीखतात शेतात ४-५ वर्षांची २,००० डाळिंबाची झाडे, बोरवेल, विहीर, शेड व गोठा असल्याचा खोटा उल्लेख केला. प्रत्यक्षात जमिनीत कोणतीही फळबाग नाही व जमीन तक्रारदार मुळ मालकांच्याच ताब्यात आहे. त्या जमिनीचे शासकीय बाजारमूल्य ७९ लाख असतानाही तिप्पट किमतीने व्यवहार करून काळा पैसा पांढरा करण्याचा हा सुनियोजित कट असल्याचे तक्रारीत नमूद आहे. तसेच शक्तीपीठ महामार्गाच्या संपादनापोटी मिळणारे ८-१० कोटी रुपये हडपण्यासाठी २००० डाळिंब दाखवून नियोजनबध्द कट रचण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

 

 

 

तसेच राजाराम बनसोडे यांनी पैशांची मागणी केली असता खरात व कोल्हाळ या आरोपींनी जीवे मारण्याची धमकी दिली व जादूटोणा करून संसार उद्ध्वस्त करण्याची भीती घातली. भोंदूबाबाची दहशत व राजकीय वरदहस्त यामुळे बनसोडे यांना तक्रार दिली नसल्याचे सांगितले. शेतकर्‍यांची फसवणूक केल्याप्रकरणी अशोक खरात, कल्पना खरात, शुक्राचार्य कोल्हाळ, रणजीत कोल्हाळ, रविकिरण नगाणे व गणेश मलपे यांचेविरुध्द भा.दं.वि. कलम ४२०, ४०६, ४६७, ४६८, ४७१, ५०६, १२०(ब), ३४ तसेच महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम कलम ३(१) अन्वये गुन्हा दाखल करणेसाठी पोलीसांत तक्रार दाखल करण्यात आलेली आहे.
अॅड. योगेश नागनाथ पवार

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

gem visa