नगरसेविका पूजा श्रीकांत वाडेकर यांनी वेधले महत्वाच्या विषयाकडे लक्ष…

सोलापूर
नगरसेविका पूजा श्रीकांत वाडेकर यांनी एका महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष वेधले असून, नुकतीच नाशिक येथील एका नामांकित आयटी कंपनीत (TCS) समोर आलेली ‘कॉर्पोरेट जिहाद’ची घटना अत्यंत धक्कादायक आहे. या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला असून, त्या प्रकरणातील रोज नवनवीन खुलासे अधिक चिंताजनक आहेत. या घटनेचे पडसाद आता स्थानिक पातळीवरही उमटू लागले आहेत.
सोलापूर शहराचा विस्तार होत असताना येथेही अनेक लहान-मोठ्या IT कंपन्या, BPO आणि KPO केंद्रे कार्यरत आहेत. या क्षेत्रांमध्ये सोलापूरसह परिसरातील अनेक तरुण-तरुणी मोठ्या संख्येने काम करत आहेत. नाशिकच्या प्रकरणामुळे सोलापूरमधील पालकांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आपल्या मुला-मुलींच्या सुरक्षिततेबद्दल पालक अत्यंत साशंक आहेत.
सोलापूर शहरातील सर्व खाजगी IT. आणि सेवा क्षेत्रातील या कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांची पार्श्वभूमी तपासणी (Background Verification) आणि कामाच्या ठिकाणच्या वातावरणाची कडक तपासणी करण्यात यावी. नाशिकसारखी कोणतीही संशयास्पद किंवा ‘कॉर्पोरेट जिहाद’ सदृश घटना सोलापुरात घडत नाही ना, याची खातरजमा करण्यासाठी विशेष पथकाद्वारे तपासणी करण्यात यावी. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी कंपन्यांना कडक नियमावली आणि मार्गदर्शक तत्वे जाहीर करावीत. वेळेतच अशा प्रवृत्तींना आवर घालावा असे निवेदन नगरसेविका पूजा श्रीकांत वाडेकर यांनी आमदार देवेंद्र कोठे आणि पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना दिले आहे,
दरम्यान आमदार देवेंद्र कोठे आपण स्वतः पोलीस आयुक्त यांच्याकडे या विषयी पाठपुरावा करणार असल्याचे नगरसेविका पूजा वाडेकर यांना सांगितले,



