crimemaharashtrapoliticalsocialsolapur

बांधकाम व्यावसायिक आत्महत्येप्रकरणी जागामालक महिलेस अटकपूर्व जामीन:- अॅड. शशि कुलकर्णी….

 

 

सोलापूर

 

 

सोलापूर येथील बांधकाम व्यावसायिक संतोष सुरवसे रा. जुळे सोलापूर यांच्या आत्महत्येप्रकरणी जागामालक श्रीमती पी. डी. कदम रा. सोलापूर यांना सोलापूर येथील सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला.

याची थोडक्यात हकीकत अशी की, सोलापूर येथील बांधकाम व्यावसायिक संतोष सुरवसे रा. जुळे सोलापूर, सोलापूर यांच्या आत्महत्येप्रकरणी दि. ११/०३/२०२६ रोजी फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे श्रीमती पी. डी. कदम व अन्य एका व्यक्ती विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केले प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे आरोपींच्या अटकेची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे श्रीमती पी. डी. कदम यांनी अॅड. शशि कुलकर्णी यांच्यामार्फत सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनाचा अर्ज दाखल केला होता.

 

 

 

 

त्यास सरकारी वकिलांनी तीव्र विरोध केला होता. त्यावर आरोपीचे वकिलांनी युक्तीवाद करताना असा मुद्दा मांडला की, बिल्डर संतोष सुरवसे यांच्या मृत्युशी आरोपी पी. डी. कदम यांचा कोणताही संबंध नाही. त्यांनी सदर बांधकाम व्यावसायिकास कधी त्रास देण्याचा प्रश्नच नाही. युक्तिवादाच्या अनुषंगाने त्यांनी मिळकतीचे खरेदीखत, बँकेचे कागदपत्रे, इ. महत्त्वाच्या बाबी कोर्टासमोर सादर केल्या. सदरची सर्व परिस्थिती, कागदपत्रांची, पोलीस कोठडीच्या तपासणीची आवश्यकता नाही, या संपूर्ण बाबींचा विचार करून न्यायालयाने जागामालक महिलेस दर बुधवारी व रविवारी पोलीस स्टेशनला हजेरी देण्याच्या अटीवर, अटकपूर्व जामीन मंजूर केला.

 

 

 

 

या कामी अर्जदार श्रीमती पी. डी. कदम तर्फे अॅड. शशि कुलकर्णी, अॅड. देवदत्त बोरगांवकर, अॅड. प्रसाद अग्निहोत्री, अॅड. आदित्य आदोने आणि सरकारतर्फे अॅड. एम. एम. देशपांडे यांनी काम पाहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button