crimemaharashtrapoliticalsocialsolapur

शेअर मार्केट फसवणूक प्रकरणी आरोपीस जामीन मंजूर:- अॅड. गुरुदत्त बोरगांवकर….

 

HTML img Tag Simply Easy Learning

सोलापूर :

 

केरळ येथील रहिवासी महेश मूरक्कना वय-३९ वर्षे, रा. थ्रीसूर केरळ याची सोलापूर येथील ज्युडिशिअल मॅजिस्ट्रेट वर्ग-१ श्री.एन.ए.मोर यांनी शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करुन फसवणूक केल्याप्रकरणीच्या गुन्ह्यात जामीन मंजूर केला.
याची थोडक्यात हकीकत अशी की, दि.०१/०५/२०२४ रोजी सकाळी ११.०० वाजणेच्या सुमारास फिर्यादी हे त्यांचे घरी असताना यातील आरोपीनी बनावट लिंक व बनावट ट्रेडींग अॅप तयार करुन त्याचे माध्यमातुन जादा शेअर मार्केट मधून जास्ती प्रॉफिट मिळवून देतो असे अश्वासन देवून फिर्यादीचा विश्वास संपादन करुन, फिर्यादीकडून कडुन वेळोवेळी एकुण रुपये 30,11,100/- ( अक्षरी तीस लाख अकरा हजार शंभर ) इतकी रक्कम वेगवेगळ्या खात्यात RTGS व UPI व्दारे जमा करण्यास भाग पाडुन ती रक्कम स्वतःचे फायदयाकरीता काढुन घेतली.

 

 

 

 

तसेच अॅपवरील फिर्यादीच्या अकाऊंटमधील माहिती डिलीट करुन शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवलेली रक्कम परत न करता फिर्यादीची आर्थिक फसवणुक केली म्हणून फिर्यादीने सायबर पोलिसात तक्रार दाखल केली होती.सदर फिर्यादीच्या अनुषंगाने सोलापूर सायबर पोलीसांनी सखोल तपास करुन आरोपींस शहर थ्रीसूर केरळ येथून अटक केली होती. सदर आरोपीने सोलापूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचे कोर्टासमोर जामीन अर्ज दाखल केला होता. सदर प्रकरणात दोषारोपपत्र दाखल झालेले आहे, तपासपूर्ण झालेला आहे, त्यामुळे आरोपीस जामीन देण्यास कोणतीही हरकत नाही. असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला तसेच त्या अनुषंगाने उच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे सादर केले, सदरचा युक्तीवाद ग्राहय धरुन मे. कोर्टाने आरोपीस जामीनावर सोडण्याचा आदेश पारीत केला.

 

 

 

सदर प्रकरणात आरोपीतर्फे अॅड. गुरुदत्त बोरगांवकर, अॅड. देवदत्त बोरगांवकर अॅड. निकिता कुलकर्णी, अॅड. शिवानी करवा सरकारतर्फे अॅड. कुलकर्णी यांनी काम पाहिले.
आर.सी.सी. 278/2026
कोर्ट : श्री.एन.ए.मोर सो

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button