crimemaharashtrapoliticalsocialsolapur

अँड राजेश कांबळे खून खटला एकची महत्त्वपूर्ण साक्ष

 

सोलापूर

 

ॲड. राजेश श्रीमंत कांबळे वय 45 राहणार 43, ब्रह्मचैतन्य नगर नवीन आर. टी. ओ. सोलापूर याचा खून केल्याप्रकरणी आरोपी संजय उर्फ बंटी महादेव खरटमल, अँड सुरेश तारू चव्हाण व श्रीनिवास महांकाळी येलदी यांच्यावर भरलेल्या खटल्याच्या सुनावणी *प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. मनोज शर्मा* यांच्यासमोर सुरू झाली.

आज रोजी *साक्षीदार नायब तहसीलदार सुधाकर बंडगर* यांनी आपले साक्षीत मयतास दिलेले जात प्रमाणपत्राची पडताळणी ही तत्कालीन तहसीलदार यांनी केली. ज्या रजिस्टरच्या नोंदीवरून जात प्रमाणपत्र दिले त्या रजिस्टरची साक्षांकित प्रत न्यायालयात हजर केली, त्याबाबत महत्वपूर्ण साक्ष नोंदवली.

त्यावर आरोपींच्या वकिलांनी घेतलेल्या उलट तपासास साक्षीदाराने नकारात्मक उत्तरे दिली.

 

 

 

 

तर खटल्यास पुढील सुनावणी ही दिनांक 22/04/2026 ही तारीख नेमली.

या खटल्यात विशेष सरकारी वकील अँड. उज्वल निकम, मूळ फिर्यादीतर्फे अँड.मिलिंद थोबडे अँड.विनोद सूर्यवंशी तर आरोपी नंबर 1 तर्फे अँड राजेंद्र फताटे, आरोपी नंबर 2 स्वतः आरोपी नंबर ३ तर्फे अँड जयदिप माने हे काम पाहत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button