crimeindia- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

अहिल्यानगरच्या पोलिसाच्या कन्येचा पिंपरी-पुणे येथे छळ – सासरच्या चौघांची निर्दोष मुक्तता…

सोलापूर

HTML img Tag Simply Easy Learning

 

अहिल्यानगर येथील पोलिसाची कन्या सौ. पल्लवी निलेश त्रिभुवन (वय-२८ वर्षे) हिचा पिंपरी-पुणे येथे सासरी अमानुष मानसिक व शारीरिक छळ व जाचहाट केल्याप्रकरणी पती – निलेश जगन्नाथ त्रिभुवन (वय-३३ वर्षे), सासू – सविता जगन्नाथ त्रिभुवन,दीर – विकी उर्फ निखील जगन्नाथ त्रिभुवन (वय-३९ वर्षे) आणि जाऊ – स्विटी उर्फ सिल्वीया निखील त्रिभुवन (वय – ३५ वर्षे) यांची अहिल्यानगर अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एन.जी.देशपांडे यांनी निर्दोष मुक्तता केली.

 

 

याची हकीगत अशी की, अहिल्यानगर येथील पोलिसाची कन्या असलेल्या पल्लवी हिचा विवाह ख्रिश्चन धर्मानुसार नगर येथे दि. २७/०५/२०१८ रोजी निलेश त्रिभुवन याचेबरोबर झाल्यावर ती सासरी पिंपरी-पुणे येथे नांदण्यास गेली. तेव्हापासून तिला वरील चारही जणांनी संगनमताने शिवीगाळ, मारहाण करून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या, गोळ्या खाण्यास जबरदस्ती करून त्रास देण्याचे प्रकार केले वगैरे अशयाची फिर्याद पल्लवीने तोफखाना पोलीस ठाणे, अहिल्यानगर येथे दिल्यावरून वरील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. याशिवाय न्यायालयातील जबाबात विनयभंग तसेच गर्भपाताचे आरोपही करण्यात आले होते. या खटल्यात सरकार तर्फे एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. अहिल्यानगरमध्ये गाजलेल्या या खटल्यात चारही आरोपींनी सोलापूर येथील ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड.अरविंद अंदोरे व त्यांच्या सहकारी वकिलांमार्फत खटला चालवून आरोपींची बाजू न्यायालयात मांडली.

 

 

 

आरोपींवर करण्यात आलेल्या बेछुट आरोपांना पुष्टी देणारा कोणताही पुरावा नसताना पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तथाकथीत गुन्हा अहिल्यानगर पोलिसांच्या मदतीने अहिल्यानगरातील पोलीस ठाण्यात नोंदवून आरोपींविरुद्ध खोटी केस केल्याचा युक्तिवाद आरोपींतर्फे अ‍ॅड.अरविंद अंदोरे यांनी केला. या खटल्यात फिर्यादीने अतिशयोक्तीने प्रसंग सांगून आरोपींना गुंतवले असल्याचा शेराही न्यायालयाने निकालपत्रात मांडून सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

 

 

यात आरोपींतर्फे अ‍ॅड.अरविंद अंदोरे, अ‍ॅड.आल्हाद अंदोरे, अ‍ॅड.अथर्व अंदोरे (सोलापूर), अ‍ॅड.सुजाता बोडखे, अ‍ॅड.किरण मोटे (अहिल्यानगर) यांनी काम पाहिले. तर सरकारतर्फे विशेष सरकारी वकील श्रीमती ए.एम.शेलॉट यांनी काम पाहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button