crimemaharashtrapoliticalsocialsolapur

बेकायदेशीर मटका चालविणाऱ्या कामगाराचा खून केल्याप्रकरणी युवकास कोल्हापूर उच्च न्यायालयातून जामीन मंजूर:- ॲड रितेश थोबडे

.

 

सोलापूर :- अथर्व दिनेश जाधव वय 19 रा :- नगर सोलापूर याचा खून केल्याप्रकरणी मत्या उर्फ श्रीनिवास रमेश माने यास कोल्हापूर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सचिन देशमुख यांनी जामीन मंजूर केला.
यात हकीकत अशी की, प्रसाद लोंढे व इतर पाच जण हे विजापूर नाका पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैधरित्या मटका जुगार चालवत होते. आरोपी प्रसाद लोंढे, बाळू काळे यांचे भागीदार निखिल भोसले, नरेश व कमलेश घोरपडे यांचे मटक्याच्या हिशोबावरून वाद होता, त्यामुळे प्रसाद लोंढे व बाळू काळे हे इतर भागीदारांवर चिडून होते. त्यामुळे त्यांनी मत्या उर्फ श्रीनिवास माने व प्रसाद लोंढे यांच्यासह इतरांनी भागीदार निखिल भोसले नरेश व कमलेश घोरपडे यांना धडा शिकवण्याचा कट रचला दि 4/10/2024 रोजी सायंकाळी पाच वाजता निखिल भोसले याच्या जागेत असलेल्या पत्रा शेडमध्ये मत्या व इतर साथीदारांनी ऑफिसमध्ये घुसून तोडफोड केली तर मयत अथर्व जाधव यास लोखंडी रॉड कोयता व तलवार अशा शस्त्राने मारहाण करून त्याचा खून केला अशा आशयाची फिर्याद मताचे वडील दिनेश प्रकाश जाधव यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात दिली.
त्यावरून पोलिसांनी मत्या माने यास अटक केली होती.
आपणास जामीन मिळावा म्हणून मत्या माने याने सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता, तो अर्ज न्यायालयाने फेटाळला होता.

त्यावर मत्या माने याने एडवोकेट रितेश थोबडे यांच्यामार्फत कोल्हापूर उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.

अर्जाच्या सुनावणीवेळी एडवोकेट रितेश थोबडे यांनी आपले युक्तीवादात दोषारोप पत्रातील अनेक त्रुटी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या त्यावरून न्यायमूर्तींनी 50,000/- जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.

*यात अर्जदार आरोपीतर्फे ॲड रितेश थोबडे, ॲड राजकुमार मात्रे यांनी तर सरकारतर्फे ॲड नितीन पाटील यांनी काम पाहिले.*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button