बदफैली मुख्यध्यापक एम. डी. बिराजदार व शिक्षणाधिकारी सचिन जगताप या दोघांना सेवेतून बडतर्फ करा – संभाजी आरमार

सोलापूर
शहरातील एन. बी. बंडा या प्रशालेत एम. डी. बिराजदार कार्यरत मुख्न्याध्यापकाने आपल्या प्रशालेतील शिक्षिकेला लैंगिक त्रास दिल्याच्या तक्रारीवरून त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झालेला आहे. या लिंगपिसाट, वासनांध मुख्न्याध्यापकाने आपल्याच प्रशालेतील शिक्षिकेला वारंवार अश्लील मेसेज पाठवणे, व्हिडीओ कॉल करून अश्लील हावभाव करणे, रात्र- अपरात्री चुकीचे मेसेज करणे, आपल्या दालनात बोलवून घाणेरडे स्पर्श करणे असे अश्लील प्रकार करून त्या शिक्षिकेला त्रस्त करून सोडले होते. संबंधित शिक्षिकेने पोलिसात फिर्याद देऊन योग्य त्या कलमानुसार मुख्याध्यापक बिराजदार याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या मुख्याध्यापकावर सेवा समाप्तीची कारवाई माध्यमिक शिक्षणाधिकारी सोलापूर सचिन जगताप यांनी केली होती. मात्र थोड्याच दिवसात त्या मुख्याध्यापकाला सेवेत पूर्ववत रुजू करून घेण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित महिला शिक्षिका आणि त्या प्रशालेतील इतर महिला शिक्षिका तसेच विद्यार्थिनी भयभीत झाले असून शाळेतील शैक्षणिक वातावरण कलुषित झाले आहे. भयमुक्त वातावरणात शिक्षण मिळण्यासाठी संबंधित मुख्याध्यापक बिराजदार याला सेवेतून बडतर्फ करणेच न्यायोचित होणार आहे.

दुसरीकडे शिक्षणाधिकारी सचिन जगताप याने देखील शिक्षिकेला त्यांच्या कामासाठी घरी बोलवून अनैतिक मागणी केल्याची घटना उघडकीस आली आहे. संबंधित महिला शिक्षिकेने प्रसार माध्यमांसमोर जाहीरपणे रडत-रडत ही बाब सांगितली आहे. संबंधित अनुसूचित जमातीच्या शिक्षिकेच्या कौटुंबिक बाबीची घाणेरडी चर्चा करून त्यांचे चारित्र्य हनन करण्याचा गलिच्छ प्रकार शिक्षणाधिकारी जगताप याने केला आहे. छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रात सुरु असलेला हा प्रकार अतिशय निंदनीय आणि शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारा आहे. स्वतः लिंगपिसाट असलेल्या शिक्षणाधिकारी जगताप याने लिंगपिसाट मुख्याध्यापक बिराजदार याला देखील अभय देऊन सेवेत सामावून घेतले आहे.

तरी या निवेदनाद्वारे आमची आपणास ठाम मागणी आहे की, लिंगपिसाट, वासनांध, बदफैली मुख्याध्यापक एम. डी. बिराजदार आणि त्याला पाठीशी घालणारा तसाच शिक्षणाधिकारी सचिन जगताप या दोघाना तात्काळ सेवेतून बडतर्फ करून फौजदारी कारवाई करावी. अन्यथा माता-भगिनींच्या संरक्षणासाठी संघटनेला रस्त्यावरची लढाई लढावी लागेल याची नोंद घेण्याकामी निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली. यावेळी संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे, कार्याध्यक्ष नगरसेवक शिवाजी वाघमोडे, उपाध्यक्ष शशिकांत शिंदे, सरचिटणीस गजानन जमदाडे, जिल्हाप्रमुख अनंतराव नीळ,जिल्हासंघटक अमित कदम, शहरप्रमुख सागर ढगे, उपशहरप्रमुख राज जगताप, रेवणसिद्ध कोळी, दक्षिण ता.प्रमुख ज्ञानेश्वर डोंबाळे, विभागप्रमुख राजू रच्चा, सागर दासी, सुधाकर करणकोट ,महिला आघाडी शहरप्रमुख उमा रजपूत, जिल्हा संघटक ऍड.गीता पवार, शहर उपाध्यक्ष संध्या हेब्बाळकर, जानवी पतंगे, कविता पगड्याल आदीजण उपस्थित होते….



