maharashtrapoliticalsocialsolapur

एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठामध्ये स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्याचे अनावरण:-प्रेम मोटे { जनसंपर्क अधिकारी }

सोलापूर

 

 

 

राष्ट्रनिर्मिती, युवा शक्ती आणि आध्यात्मिक मूल्यांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठामध्ये येत्या ७ मार्च रोजी सकाळी ११ वाजता श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र अयोध्या ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या शुभहस्ते होणार आहे. नालंदा विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि ‘परम’ महासंगणकाचे शिल्पकार पद्मभूषण डॉ. विजय भटकर, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूरचे उपाध्यक्ष सद्‌गुरू गहिनीनाथ महाराज औसेकर या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत व माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न होणार आहे. याप्रसंगी एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठाच्या कार्यकारी अध्यक्षा प्रा. स्वाती कराड चाटे, विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू प्रा. गोपाळकृष्ण जोशी तसेच संस्थेचे विश्वस्त आणि पदाधिकारी उपस्थित असणार आहेत.

 

 

प्रेम मोटे { जनसंपर्क अधिकारी}

माईर्स एमआयटी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि युनेस्को मानवाधिकार, लोकशाही व शांतता चेअरधारक विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माईर्स एमआयटीच्या विश्वस्त व महासचिव प्रा. स्वाती कराड चाटे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर येथे एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठाची स्थापना करण्यात आली.

 

 

 

 

विद्यापीठामध्ये उभारण्यात आलेला स्वामी विवेकानंदांचा पुतळा हे केवळ एक स्मारक नसून विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान ठरणार आहे. त्यांचे विचार, राष्ट्रभक्ती, मानवता आणि शांतीचा संदेश तरुण पिढीला नवी दिशा देणारा आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी सोलापूरमधील सर्व क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या पत्रकार परिषदेस विद्यापीठाचे कर्मचारी शांतिकुमार साबळे यांची उपस्थिती होती…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button