maharashtrapoliticalsocialsolapur

अकलूजमध्ये मोहिते-पाटील परिवाराचा पक्षप्रवेश; राष्ट्रवादी (अजित पवार गट) ची ताकद वाढ…

 

अकलूज

अकलूज शहरात आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) च्या वतीने आयोजित केलेल्या भव्य पक्षप्रवेश सोहळ्याला प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात पद्मजादेवी प्रतापसिंह मोहिते पाटील, उर्वशीराजे धवलसिंह मोहिते पाटील यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केला.

 

 

या पक्षप्रवेश सोहळ्याला जनसेवा संघटनेसह विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
मोहिते-पाटील परिवाराच्या या निर्णयाचे स्वागत करताना जिल्हाध्यक्ष उमेश पाटील म्हणाले की,मोहिते-पाटील कुटुंबाचा पक्षात प्रवेश हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे अकलूज, माळशिरस तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी (अजित पवार गट) ची ताकद अधिकाधिक मजबूत होणार आहे.

 

 

 

पद्मजादेवी मोहिते पाटील यांनीही उपस्थित कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानत सांगितले की
अकलूज परिसरातील जनतेच्या विकासासाठी आम्ही एकत्र येऊन काम करू. आजचा दिवस आमच्यासाठी खास आहे.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विकासाभिमुख धोरणांवर आमचा विश्वास आहे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली संघटना अधिक सक्षम करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

 

 

 

पक्षप्रवेश झाल्याने स्थानिक राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होणार असून, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) ला तालुकास्तरापासून जिल्हास्तरापर्यंत नवा वेग, नवी ताकद आणि नवे नेतृत्व प्राप्त झाल्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

 

 

कार्यक्रमाच्या शेवटी जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी उपस्थित सर्व नव्या कार्यकर्त्यांचे स्वागत करून आगामी निवडणुकांमध्ये पक्ष बळकट करण्याचे आवाहन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button