crimemaharashtrapoliticalsocialsolapur

प्रकाश वानकर यांच्या घरात घरफोडी ! आंतरराज्यीय आरोपीच्या शहर गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या

एकूण २० लाख ५२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत...

दिनांक २७/१२/२०२५ रोजी सलगरवस्ती पोलीस ठाणे हद्दीतील राजमुद्रा रेसीडेन्सी फेज ०१, दामोदर निवास मधील रहिवाशी प्रकाश दामोदर वानकर यांच्या  घरातील रोख रक्कम रू.१५,८०,०००/- चोरीस गेले बाबत सलगर वस्ती पो.स्टे. गुरनं-३५१/२०२५ भान्यासंक-३३१ (४), ३०५ अन्वये दि.२८/१२/२०२५ रोजी गुन्हा दाखल होता. या दाखल मालाविषयक गुन्हा उघडकीस आणणे बाबत वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी गुन्हे शाखेकडील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन केले होते.

त्यानुसार अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश पाटील-सोनवणे व त्यांच्या तपास पथकानी घटनास्थळ व आजुबाजुच्या परिसरात तांत्रिक तपास करुन व गोपनिय खबऱ्याच्या मदतीने दिनांक ०१/०१/२०२६ रोजी परराज्यातील इसम नामे-मोईन मौलानासाब दुधेकुला, वय-२९ वर्षे, व्यवसाय-गॅरेज, रा. १-३५, नरसापूर, ता. मरपल्ली, जि. विकाराबाद, राज्य- तेलंगणा यास ताब्यात घेतले. यात  इसम नामे मोईन मौलानासाब दुधेकुला याच्याकडे  अधीक चौकशी केली असता त्याच्या कब्जातील स्विफ्ट कार क्रमांक AP 36 AH 8837 मधुन रोख रक्कम तसेच  घरातील इंटरनेट राऊटर व गुन्ह्याकामी वापरलेली  कार असा एकुण २०,५२,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. इसम नामे मोईन मौलानासाब दुधेकुला याच्याविरुद  हैद्राबाद याठिकाणी देखील मोटार सायकल चोरीचे देखील गुन्हे दाखल आहेत. या आरोपीकडून घरफोडीच्या गुन्ह्यातील एकूण २० लाख ५२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

 

तपासात  आरोपीने त्याची ओळख पोलीसांना पटू नये म्हणून, घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डि.व्ही.आर. समजून इंटरनेट राऊटर देखील घेवुन गेलेला होता. तसेच चोरी करतेवेळी त्याच्या  फिंगर प्रिंन्ट कोठेही मिळु नये म्हणून हातास रूमाल बांधुन चोरी केलेली होती. तसेच सदर घरफोडी चोरीत मिळालेले पैसे घेवुन तो गोवा येथे जावुन मौज-मजा करणार असल्याचे देखील चौकशीत सांगितले आहे.

ही दमदार कामगीरी एम. राज कुमार, पोलीस आयुक्त, सोलापूर शहर, डॉ. अश्विनी पाटील, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/वि.शा.), राजन माने, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे,  अरविंद माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा, यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश पाटील-सोनवणे व त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार विजयकुमार वाळके, राहुल तोगे, विद्यासागर मोहिते, तात्यासाहेब पाटील, गणेश शिंदे, चालक-बाळासाहेब काळे, सतिश काटे, सायबर पो.स्टे. कडील प्रकाश गायकवाड व मच्छिद्र राठोड, यांनी यशस्वीपणे पार पाडली…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button