maharashtrapoliticalsocialsolapur

६५ वा महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन उत्साहात साजरा…

महाराष्ट्र पोलीस दलाच्या गौरवशाली परंपरेचा प्रतिक असलेल्या ६५ वा महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन पोलीस आयुक्त सोलापूर शहर, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, केगांव व समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट क्र. १०, सोलापूर यांचे संयुक्तपणे राज्य राखीव पोलीस बल, गट क्र. १०, सोलापूर येथील कवायत मैदानावर अत्यंत शिस्तबद्ध व उत्साही वातावरणात संपन्न झाला.

 

 

 

या कार्यक्रमाची सुरुवात परेड संचलन व हर्ष फायर परेडने करण्यात आली. परेडचे नेतृत्व परेड कमांडर समादेशक सहाय्यक / श्री महेश मते यांनी उत्कृष्टरित्या केले. सदरील परेडमध्ये सोलापूर शहर, सोलापूर ग्रामीण, पोलीस प्रशिक्षण केंद्र, राज्य राखीव पोलीस बल, गट क्र. १० च्या तुकड्यांचा समावेश होता.

 

 

सुजीत मिश्रा, डीव्हीजनल रेल्वे मॅनेजर, सोलापूर हे प्रमुख अतिथी म्हणुन कार्यक्रमास लाभले आहेत. तसेच या कार्यक्रमास श्री एम राजकुमार, पोलीस आयुक्त सोलापूर शहर, श्री अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, श्री गोहर हसन, पोलीस उपायुक्त, श्रीमती अश्विनी पाटील, पोलीस उपायुक्त, श्री विजय कबाडे, पोलीस उपायुक्त, श्रीमती मनिषा दुबाले, पोलीस अधीक्षक, शस्त्र निरीक्षण शाखा-पुणे तसेच इतर अधिकारी, अंमलदार, पत्रकार, नागरीक व शालेय विद्यार्थी उपस्थित होते.

 

 

प्रमुख अतिथी आपल्या भाषणात म्हणाले की, महाराष्ट्र पोलीस दल हे केवळ कायदा अंमलबजावणीचे माध्यम नसून समाजातील शांतता, सुरक्षितता व विश्वास याचे आधारस्तंभ आहे. ते पुढे म्हणाले की, पोलीस सेवा ही नोकरी नसून ती समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे. अधिकारी व जवानांनी दाखवलेली निष्ठा, शिस्त व त्याग हे संपूर्ण प्रशासनासाठी प्रेरणादायी आहे.

 

 

एम राजकुमार, पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांनी आपल्या प्रास्ताविकेमध्ये महाराष्ट्र पोलीस दलाच्या सेवाभावाचे कौतुक करत सर्वांना महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या व समादेशक, डॉ. दिपाली काळे यांनी सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त करत या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता सहाय्य केलेल्या सर्वांचे आभार व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia