maharashtrapoliticalsocialsolapur

महूद येथील सुनील कांबळे खून खटला:युवकास कोल्हापूर उच्च न्यायालयातून जामीन मंजूर:- ऍड रितेश थोबडे

 

HTML img Tag Simply Easy Learning

सोलापूर

 

 

सुनील अनिल कांबळे वय 32 रा महूद ता सांगोला जिल्हा सोलापूर याचा खून केल्याप्रकरणी अनिल उर्फ सोनू यशवंत चव्हाण वय-२४, रा महूद ता सांगोला जिल्हा सोलापूर यांस कोल्हापूर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री शिवकुमार दिघे* यांनी जामीन मंजूर केला.

 

यात हकीकत अशी की, दि 11/7/2024 रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास दत्तात्रय लोखंडे याने ओंकार पंडित यास मारहाण केली होती. त्यावेळी ओंकार याने त्याचा मित्र आरोपी ऋषिकेश शिरतोडे यास मारहाणीची घटना सांगितली होती त्याबाबत आरोपी ऋषिकेश शिरतोडे व अनिल चव्हाण याने गणेश लोखंडे यास ओंकार याला मारहाणीबाबतचा जाब विचारला त्यावेळी त्यांचे बाचाबाची झाली होती. त्यानंतर रात्री 10:00 वाजेच्या सुमारास ऋषिकेश शिरतोडे व अनिल चव्हाण हे महूद येथील समाज मंदिराकडे येऊन नागेश लोखंडे आणि सुनील कांबळे या दोघांना झालेल्या भांडणाचा राग मनात धरून तुम्हाला बघून घेतो, सोडत नाही असे म्हणून निघून गेले.

 

 

 

त्यानंतर रात्री 10:15 वाजेच्या सुमारास अनिल व इतर आरोपी हे धारदार हत्यारे घेऊन झालेल्या भांडणाचा राग मनात धरून सुनील कांबळे यांच्या डोक्यात मानेवर गंभीरवार करून त्यास जीवे ठार मारले. त्यानंतर ते सर्वजण योगेश काटे यांच्या गाडीवर बसून पळून गेले. घटनेबाबत निशा कांबळे हिने सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावर योगेश काटे यास अटक झाली होती.

 

आपणास जामीन मिळावा म्हणून अनिल याने पंढरपूर सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. तो अर्ज न्यायालयाने फेटाळला होता

त्यावर अनिल याने ऍड रितेश थोबडे यांचेमार्फत कोल्हापूर उच्च न्यायालयात जामीन मिळणेसाठी अर्ज दाखल केला होता.

अर्जाच्या सुनावणीच्या वेळी ऍड रितेश थोबडे यांनी आपले युक्तीवादात, सदर गुन्ह्याचा तपास हा पूर्णत्वात आलेला आलेला असून दोषारोप पत्र देखील दाखल झालेले आहे त्यामुळे आरोपीस गजा आड ठेवल्याने कोणतीही फलनिष्पत्ती होणार नाही असा युक्तिवाद मांडला त्यावरून न्यायमूर्तींनी 20,000/- रुपयाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.

 

यात अर्जदार आरोपीतर्फे ऍड रितेश थोबडे यांनी तर सरकार तर्फे ऍड पी. एस. राणे यांनी काम पाहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button