solapur

प्राण घातक हल्ला करुन गंभीर दुखापत केल्याप्रकरणी आरोपींना जामीन मंजूर..

सोलापूर

 

महंमद साहब जावेद शेख राहणार 513 राहुल गांधी झोपडपट्टी सोलापूर यांना आरोपी नामे समीर उर्फ अब्दुल्ला रोकडा, जिलानी शेख, सिकंदर शेख, आसिफ शेख, शाहीर शेख ,दाऊद अशपाक शेख राहणार मुस्लिम पाच्छापेठ सोलापूर ,यांनी ते चालवत असलेल्या इंस्टाग्राम झिरो चार या ग्रुप वर तु का येत नाही म्हणून फिर्यादी हे दिनांक 9 -12 -2025 रोजी सायंकाळी 6-00 वाजण्याच्या सुमारास त्यांचे फळ विक्रीचा व्यवसाय बंद करून जात असताना बाहुबली कार्पेट च्या समोर समीर रोकडा ,जिलानी शेख ,असिफ शेख, सिकंदर शेख ,शाहीर शेख, दाऊद शेख व इतर दहा ते बारा लोक यांनी विटा ने
लाकडी दांडक्याने मारहाण केले तसेच समीर रोकडा असिफ शेख व जिलानी शेख त्याने त्यांच्या हातातील चाकूने फिर्यादी व त्याच्या मामाचा मुलगा सुफियान त्याच्या हातावर व कपाळावर वार करून गंभीर दुखापत केली म्हणून फिर्याद जेलरोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 715 /2025 अन्वये बी.एन.एस चे कलम 118 (2),189( 2) 189 (4) ,191 (1 ),191 (3 ),190. 115 (2 )352 व 351 (2 )प्रमाणे दाखल केली होती त्यावरून आरोपी समीर रोकडा जिलानी शेख असिफ शेख यांना पोलिसांनी दिनांक 10-12-2025 रोजी अटक करून मे. कोर्टासमोर हजर केले होते .

 

 

 

मे. कोर्टानी आरोपींना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती त्यानंतर पुन्हा पोलिसांकडून पाच दिवसाची पोलीस कस्टडीचे मागणी करण्यात आली होती परंतु मेहरबान कोर्टाकडून सदरची मागणी फेटाळून आरोपींना न्यायालयीन कोठडीत रवाना करण्यात आले होते त्यानंतर आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट डी.एन‌. भडंगे व ॲडव्होकेट एन.एन. भडंगे यांनी आरोपींच्या जामीनाचा अर्ज ठेवला होता सदर जामीन अर्जास सरकारी वकिलांकडून तसेच मूळ फिर्यादीच्या खाजगी वकिलांकडून तीव्र विरोध दर्शवण्यात आला तसेच मूळ फिर्यादी कडून बि एन एस चे कलम- 109 म्हणजेच आयपीसी चे कलम 307 प्रमाणे कलम वाढीचा अर्ज दाखल केला होता तसेच आरोपीला जामीन मिळू नये म्हणून फिर्यादी व साक्षीदाराचे प्रतिज्ञापत्र दाखल करून साक्षीदारांच्या हातावर 35 टाके पडले आहेत व कपाळावर 6 टाके पडले आहेत .

 

 

 

 

 

अशा प्रकारचे प्रतिज्ञापत्र दाखल करून त्यांचे फोटोग्राफ्स दाखल करून त्यांना मे. कोर्टात समक्ष हजर करून आरोपीच्या जामीन अर्जावर तीव्र विरोध दर्शवून अद्याप तपास पूर्ण झालेला नाही तसेच आयपीसी चे कलम 307 हे वाढण्याची दाट शक्यता असल्याने आरोपींना जामीन देण्यात येऊ नये असा युक्तिवाद केला होता परंतु आरोपीच्या वतीने सदर गुन्ह्यातील कलम हे सध्याच्या केसला लागू पडत नाहीत तसेच आरोपींनी कोणताही गुन्हा केलेला नाही आरोपी हे मागील तेरा दिवसापासून कस्टडीमध्ये आहेत व मूळ फिर्यादी कडून जाणून-बुजून आरोपींच्या जामीन अर्जावर सुनावणी होऊ नये म्हणून एन के एन प्रकारे अर्ज देऊन विलंब लावला जात आहे असे युक्तिवाद केला .

 

 

 

 

मे. कोर्टानी आरोपीकडून केलेला युक्तिवाद व बचाव ग्राह्य मानून मे.ज्युडीशीयल मॅजेस्ट्रेट वर्ग एक श्रीमती एम.पी.मर्ढेकर मॅडम यांनी आरोपींना तारीख 23 -12- 2025 रोजी रक्कम रुपये 25000/- जामीनावर साक्षीदारांवर दबाव आणणार नाही तसेच पोलीस स्टेशनला हजेरी लावून आरोपींचा जामीन अर्ज मंजूर केला या आरोपीच्या वतीने ॲड.डी.एन. भडंगे व ॲड.एन.एन‌.भडंगे, ॲड. योगेश पवार, ॲड.दिपाली गायकवाड यांनी काम पाहिले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia