solapur

गांजा विक्रीच्या गुन्ह्यातील आरोपी संतोष भोसले याला जामीन मंजूर…

सोलापूर :

 

सोलापूर शहरातील सदर बाजार पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक ४१६/२०२५ अंतर्गत गांजा विक्रीच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या आरोपी संतोष बाळू भोसले याला न्यायालयाने मोठा दिलासा देत जामीन मंजूर केला आहे.

या प्रकरणात आरोपी गांजाची विक्री करत असल्याचा आरोप ठेवत पोलिसांनी एनडीपीएस कायद्याअंतर्गत कारवाई केली होती. तपासानंतर आरोपीस अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते.

 

 

जामीन अर्जावर झालेल्या सुनावणीदरम्यान आरोपीच्या वतीने ॲड. मल्हार भारत बन्ने, ॲड. महादेव गोटे, ॲड. वल्लभी सोनवले व ॲड. श्री. अंकलगी यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण व मुद्देसूद असा युक्तिवाद सादर केला. तपासातील त्रुटी, पुराव्यांचे स्वरूप, आरोपीची वैयक्तिक पार्श्वभूमी तसेच कायद्याच्या तरतुदी न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या.

 

 

 

यावेळी सरकार पक्षाकडून सरकारी चिवरी वकिलांनी आरोपीस जामीन देण्यास विरोध करत आपली बाजू मांडली.

दोन्ही बाजूंचा सखोल युक्तिवाद ऐकून, तसेच प्रकरणातील एकूण परिस्थितीचा विचार करून न्यायालयाने आरोपी संतोष बाळू भोसले याला योग्य अटी व शर्तींवर जामीन मंजूर केला.

 

 

या आदेशामुळे आरोपीला तात्पुरता दिलासा मिळाला असून, पुढील तपास व न्यायालयीन प्रक्रिया नियमानुसार सुरू राहणार आहे. सदर प्रकरण सध्या कायदेशीर चर्चेचा विषय ठरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia