सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ – एक खिडकी कक्षाचे ठिकाण बदल
उद्या पासून महापालिका प्रशासकीय इमारत येथे एक खिडकी संदर्भातील अर्ज स्वीकारले जाईल..

सोलापूर —
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या अनुषंगाने उमेदवार व नागरिकांना विविध निवडणूक विषयक सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी सुरु करण्यात आलेला एक खिडकी कक्ष यापूर्वी नॉर्थ कोर्ट प्रशाला, सोलापूर येथे कार्यान्वित करण्यात आला होता.
मात्र, निवडणूक प्रक्रियेच्या पुढील टप्प्यांकरिता तसेच प्रशासनिक सोयीसाठी उद्या दि. २३/१२/२०२५ पासून एक खिडकी कक्ष सोलापूर महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीत स्थलांतरित करण्यात येत आहे.

या एक खिडकी कक्षामार्फत उमेदवारांना व नागरिकांना नामनिर्देशन अर्ज, विविध ना-हरकत प्रमाणपत्रे (NOC), निवडणूक विषयक माहिती, अर्ज स्वीकृती तसेच इतर आवश्यक सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.तरी, सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ संदर्भातील कोणतेही अर्ज सादर करणे, माहिती घेणे किंवा निवडणूक विषयक कामकाजासाठी नागरिकांनी व इच्छुक उमेदवारांनी थेट सोलापूर महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीतील एक खिडकी कक्ष येथे संपर्क साधावा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, सुलभ व वेळेत पूर्ण करण्यासाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असेही आवाहन यावेळी करण्यात आले आहे.



