crimemaharashtrapoliticalsocialsolapur

संघटित गुन्हेगारीच्या (मोक्का) कायद्यानुसार दाखल गुन्ह्यातुन अनिसअहमद रंगरेज याची कोल्हापूर उच्च न्यायालयातून जामीनावर मुक्तता:- ॲड रितेश थोबडे

 

सोलापूर

 

संघटित गुन्हेगारीच्या (मोक्का) कायद्यानुसार दाखल गुन्ह्यात अनिसहमद रियाजअहमद रंगरेज वय 33 राहणार सोलापूर यास कोल्हापूर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री शिवकुमार दिघे यांनी जामीन मंजूर केला.

यात हकीकत अशी की दि.02/07/2025 सुमारास सोहेल सय्यद हा नई जिंदगी सोलापूर येथे असताना यातील अर्जदार/आरोपी अनिसहमद व इतर आरोपींनी हात उसने दिलेले पैसे परत मागण्याचे कारणावरून त्याला लाथाबुक्क्यांनी व चाकूने मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. अशा आशयाची फिर्याद सोहेल याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली होती. त्यावरून पोलिसांनी अनिसहमद यास अटक केली होती. तपासा दरम्यान पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारीच्या (मोक्का) कायद्यानुसारआरोपी विरुद्ध कलम वाढ केली होती.

 

त्यावर अनिसहमद याने सत्र न्यायालयात जामीन मिळणेसाठी अर्ज दाखल केला होता तो अर्ज न्यायालयाने फेटाळला होता.

आरोपी अनिसहमद याने ॲड रितेश थोबडे यांचे मार्फत कोल्हापूर उच्च न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता.

 

 

 

अर्जाच्या सुनावणीच्या वेळी ॲड रितेश थोबडे यांनी आपले युक्तिवादात अर्जदा/आरोपी याचा गुन्ह्यातील सहभाग पाहता त्याचा सक्रिय असा सहभाग नाही. जो काही आलेला पुरावा आहे त्यात तो संघटित गुन्हेगारीचा म्होरक्या नाही असा युक्तिवाद मांडला तो ग्राह्य धरून न्यायाधीशांनी 20,000 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.

 

यात आरोपीतर्फे ॲड रितेश थोबडे ॲड राजकुमार मात्रे तर सरकार तर्फे ॲड एस एस चौधरी यांनी काम पाहिले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button