maharashtrapoliticalsocialsolapur

जिल्हा पुरवठा विभागाच्या आकाचा कारनामा भारतीय किसान मोर्चा आक्रमक …

सोलापूर

पंढरपूर तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात तीन झीरो कर्मचारी गेल्या कित्येक वर्षांपासून कार्यरत आहेत. नागरिकांची कामे वेळेवर न करणे, सामान्य नागरिकांना मदत न करता अरेरावी करणे तसेच अधिकार नसताना गोपनीय माहिती ,कागदपत्रे हाताळणे हे अयोग्य आहे.
शासन तर्फे , नवीन चार एम पी एस सी निवड करण्यात येऊन चार क्लार्क पदांची नियुक्ती केली आहे व हे नवीन कर्मचारी रुजू झाले आहेत. त्यामुळे झिरो कर्मचारी यांची आवश्यकता बिलकुल नाही,नवीन अधिकृत शासकीय कर्मचारी सर्व काम करायला सक्षम आहेत आणि हुशार आहेत.

 

या तीन झीरो कर्मचाऱ्यांनी सामान्य दुकानदार यांना नेहमीच आजवर त्रास दिला आहे.माहिती अधिकार तसेच वेगवेगळे सामाजिक ,राजकीय अधिकारी यांच्यातर्फे दबाव आणून दुकानदार बांधवांना त्रास दिला आहे. यांनी खाजगी एजंट नेमले आहेत ज्यांच्या मार्फत व्यवहार करण्यात येतात.

 

 

1 ) सूरज कांबळे
2) सिद्धू देठे
3 ) भारत कांबळे
या तीन झीरो कर्मचारी यांना त्वरित कामकाज करण्यापासून रोखण्यात यावे.या झिरो कर्मचाऱ्यांना जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे पाठबळ असल्याचेही हळणवर म्हणाले..
या झिरो कर्मचाऱ्यांची हकालपट्टी करण्यात यावी. शासकीय कामकाज , शासन अधिकृत कर्मचारी यांच्या वतीने करण्यात यावे.अन्यथा सत्तेत राहूनही आंदोलन करण्याचा इशारा भारतीय किसान मोर्चाचे प्रदेश सचिव माऊली भाऊ हळणवर यांनी दिला आहे.

 

या बाबत माऊली हळणवर यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना याबाबत निवेदन दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia