crimemaharashtrapoliticalsocialsolapur
आगामी विधानसभा निवडणुक -2024 च्या अनुषंगाने सोलापूर तालुका, पोलीस ठाणे कडुन रूट मार्च (पथ संचलन)…

आगामी विधानसभा निवडणुक – 2024 ची मतदान प्रक्रिया 20 नोव्हेबर रोजी होणार आहे. सदरी निवडणुक प्रक्रिया निर्भय व शांततेत पार पाडावी याकरीता सोलापूर तालुका, पोलीस ठाणे कडील कार्यरत असलेले पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार व राज्य राखीव पोलीस दल, कर्नाटक येथील पोलीस दलाच्या वतीने सोलापूर तालुका, पोलीस ठाणेच्या कार्यक्षेत्रातील मौजे बोरामणी, कासेगाव, दक्षिण सोलापूर, मौजे नान्नज व बीबीदारफळ ता.उत्तर सोलापूर या गावाच्या प्रमुख मार्गावरून या गावातुन रूट मार्च (पथ संचलन) घेण्यात आले आहे.





