पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाच्या अध्यक्षपदी डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांची निवड….

सोलापूर
हैदराबाद येथील पद्मशाली पद्मशाली भवनात शनिवारी दिनांक 3 फेब्रुवारी 2025 रोजी अखिल भारतीय पद्मशाली संघाचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाचे अध्यक्ष पद निवडीचे पत्र डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांना प्रदान करण्यात आले.
यावेळी ऑल इंडियाचे सर्व पदाधिकारी ऑल इंडिया गौरव अध्यक्ष श्रीधरजी सुंकुरवार अध्यक्ष कंदिकतला स्वामी जनरल सेक्रेटरी जगन्नाथ गड्डम उपाध्यक्ष रामकृष्ण कोंड्याल राजकीय विभागाचे अध्यक्ष बोलला शिवशंकर सेक्रेटरी तुकेश भैरी महाराष्ट्र चे निरीक्षक संघा मुंबई पद्मशाली संघाचे अध्यक्ष गंजी सर यांच्यासह सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा सत्कार करण्यात आला.

यावेळी पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाचे जनरल सेक्रेटरी दयानंद मामडयाल
पद्मशाली न्याती संस्थेचे सेक्रेटरी संतोष सोमा युवक संघटनेचे अध्यक्ष शेखर कटकम राकेश पुंजाल सूर्यकांत जिंदम यांच्यासह डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांचे समर्थक उपस्थित होते.
ऑल इंडिया पद्मशाली संघाचे पदाधिकाऱ्यांनी डॉ सूर्यप्रकाश कोठे यांना पुढील कार्यास शुभेच्छा व सोबत असल्याचे ग्वाही दिली व सन्मान केला सत्काराला उत्तर देताना नूतन अध्यक्ष डॉ सूर्यप्रकाश कोठे यांनी कोठे परिवाराला समाज सेवेचा वारसा तात्यासाहेब कोठे यांच्यापासून मिळाले असून ह्या पदाचा उपयोग समाजातील सर्वांना सोबत घेऊन समाजाचे एकी व प्रगतीसाठी करणार असल्याचे सांगितले….



