शासकीय विश्रामगृह येथे संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटनेची शहर – जिल्हा आढावा बैठक आनंदी वातावरणात संपन्न…

सोलापूर
संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटनेची आढावा बैठक प्रदेश संघटक दीपकदादा वाडदेकर व प्रदेश संघटक प्रदीप जी कणसे यांच्या प्रमुख उपस्थितीत व पुणे विभाग चे नूतन विभागीय अध्यक्ष (पश्चिम महाराष्ट्र) सुनील जी पासलकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली प्रथम नूतन विभागीय अध्यक्षांचे संभाजी ब्रिगेड सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने स्वागत करून सत्कार करण्यात आला व त्यानंतर आढावा बैठकीची सुरुवात झाली वरील आढावा बैठकीमध्ये संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले यांनी सोलापूर विभाग जिल्ह्याचा संपूर्ण आढावा मागील वर्षाचा कागदोपत्री सादर केला त्याचबरोबर महानगर अध्यक्ष शिरीष जगदाळे यांनीही सोलापूर शहर कार्यकारिणीचा संपूर्ण आढावा मागील वर्षीचा कागदोपत्री त्यांना सादर केला
त्याचबरोबर आढावा घेतल्यानंतर
#नूतन विभागीय अध्यक्षांनी त्यांच्या भाषणात सर्व संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांना आश्वासन दिले की तुम्ही अर्ध्या रात्री मला कॉल करा मी तुमच्या मागे आहे कुठल्याही सामाजिक आंदोलनात कोणीही मागे राहू नका संभाजी ब्रिगेड च कार्य हे सतत अहोरात्र चालू राहिलं पाहिजे त्यासाठी मी कायम तुमच्या पाठीमागे आहे त्याचबरोबर सोलापूर विभागातील सोलापूर जिल्हा व शहर कार्याचा व पदाधिकाऱ्यांचा गौरव त्यांनी आपल्या भाषणात केला व सत्कार बद्दलआभार मानले.
#प्रदीप संघटक प्रदीप जी कणसे यांनी प्रवीण दादा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली तरुणांची संघटन मजबूत करून तरुणांची मस्तक ही सशक्त करण्याचा आव्हान सर्व पदाधिकाऱ्यांना केले त्याचबरोबर प्रवीण दादाच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र धर्माची संकल्पना याबद्दलही सविस्तर चर्चा केली व सर्व पदाधिकाऱ्यांच्या कार्याबद्दल व पुढील कामास शुभेच्छा दिल्या
#प्रदेश संघटक दीपक दादा वाडदेकरांनी केडर बेस संघटन करण्याच्या सूचना सर्व पदाधिकाऱ्यांना दिल्या व संभाजी ब्रिगेडचे आक्रमकता कधीही कमी झाली नाही पाहिजे त्याची धग ही सतत जनतेच्या प्रश्नासाठी कायम राहिली पाहिजे .
संभाजी ब्रिगेड ही बहुजन समाजातील युवकांचे संघटना आहे संभाजी ब्रिगेडचे विचार हे तळागाळात पोचवण्याचा जबाबदारी ही सर्व पदाधिकाऱ्यांनी घेण्याच्या सूचना व मार्गदर्शन त्यांनी केले यावेळी आढावा बैठकीसाठी संभाजी ब्रिगेड सोलापूरचे जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले, महानगर अध्यक्ष शिरीष जगदाळे महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मीनलदास वकील आघाडीचे जिल्हाध्यक्ष अँड गणेश कदम महिला शहराध्यक्ष मनीषा कोळी जिल्हा कार्याध्यक्ष शेखर भोसले संभाजी ब्रिगेडचे सचिव सिद्धराम सावळे शहर कार्याध्यक्ष सिताराम बाबर व प्रशांत देशमुख शहर उपाध्यक्ष फिरोज सय्यद व दिलीप भोसले जिल्हा उपाध्यक्ष दिलीप निंबाळकर मुकुल मानवे सचिव राजेंद्र माने माजी पुणे विभागीय अध्यक्ष श्याम कदम दत्ता डिंगणे महेश मसलकर साहेब जयश्री जाधव सुनिता घंटे व बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते



