solapur

अवैध हातभट्टी निर्मिती केद्रावर/अवैध देशी-विदेशी मद्य विक्री वाहतुकीवर व अवैध धाब्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई…

कारवाईत १८,१३,११० मुद्देमाल जप्त

सोलापूर

 

राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांची सागर धोमकर साहेब विभागीय उपायुक्त पुणे विभाग याच्या निर्देशानुसार मा. श्रीमती भाग्यश्री पं. जाधव, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर मा. श्री जे. एन. पाटील प्र. उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर याचे समवेत दि. २० व २१ डिसेंबर २०२५ रोजी राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांची सोलापूर शहर व जिल्ह्यात केलेल्या अवैध हातभट्टी निमिती केद्रावर/अवैध देशी-विदेशी मद्य विक्री व वाहतुकीवर केलेल्या धडक कारवाईत एकुण २२ गुन्हे नोंद करण्यात आले असुन २२ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. सदर कारवाईत १५,१४० ली. रसायन, १४६२लि. हातभट्टी दारु, ५६.० ब. लि. देशी मद्य, ३.० ब.ली. विदेशी मद्य, ८.० ब.ली. बिअर, तसेच ०१ चार चाकी टेम्पो व ०४ दुचाकी वाहनासह एकुण रूपये १८,१३,११०/- रुपयाचा प्रोव्हि. गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

 

 

तसेच या विभागाकडुन या कालवधीत अवैध मद्य विक्री करणा-या व मद्य पिण्यास परवानगी देणा-या एकूण ०८ ढाब्यावर गुन्हे नोंदविण्यात आले असून ३२ आरोपींवर कारवाई करण्यात आलेली आहे. हॉटेल राजमुद्रा हॉटेल गोकुळ ढाबा, धनगर वाडा ढाबा, के के. के. मटण भाजनालय, हॉटेल अरहान अश्या ढाब्यावर कलम ६८ व ८४ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. तसेच अशाच प्रकारची धडक कारवाई या पुढेही चालू राहणार असुन आचारसंहिताच्या पार्श्वभुमीवर या विभागाकडुन विषेश पथके नेमण्यात आली आहेत.

 

 

 

सदर कारवाई निरीक्षक ओ व्ही घाटगे, राकेश पवार पंकज कुंभार, सचिन भवड, तसेच दुय्यम निरीक्षक सर्वश्री राम निंबाळकर, धनाजी पोवार, सुखदेव सिद, सचिन शिंदे समाधान शेळके, सुदर्शन संकपाळ, सहाय्यक दुय्यम निरीक्षक श्री. मुकेश चव्हाण, श्री संजय चव्हाण, जवान सर्वश्री आण्णा करचे, नंदकुमार वेळापूरे, वसंत राठोड, चेतन व्हनंगुटी, प्रशांत इगोले अनिल पांढरे, विनायक काळे, अण्णासाहेब फड, कपिल स्वामी गजानन ढब्बे, तानाजी जाधव पवन उगले, योगीराज तोग्गी, स्वप्निल आरमाळ, योगेश गाडेकर, पंढरीनाथ भुतेकर, मंगेश मारसिंग, केतन तानगावडे महिला जवान शिवानी मुढे वाहनचालक दिपाली सलगर संजय नवले व दिपक वाघमारे यांनी पार पाडली.

 

 

 

अवैध मद्यविक्री. अवैध निर्मिती व वाहतूकी विरोधात कारवाई या पुढेही चालु राहणार असून अवैध मद्याबाबत माहिती असल्यास टोल फ्री १८००२३३९९९९ क्रमांक अथवा व्हॉटस अॅप क्रमांक ८४२२००११३३ या कार्यालयास माहिती दिल्यास माहिती देणा-याचे नाव गुप्त ठेवले जाईल असे श्रीमती भाग्यश्री पं. जाधव, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क. सोलापुर यांनी सांगुन अवैध मद्याबाबतची माहिती कळविण्याचे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button