crimemaharashtrapoliticalsocialsolapur

वाहतूक पोलिसाने अडविले स्वतः वरच ब्लेडने वार केले, तिघांवर गुन्हा दाखल…

सोलापूर :-

वाहतूक पोलिसाने ट्रिपलसीट असल्याने अडविल्यामुळे एका युवकाने स्वतः वर ब्लेडने ब्लेडने वार करून घेतल्याची धक्कादायक घटना घडली असून यामध्ये संतोष कांबळे हा जखमी झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,शहर वाहतूक पोलीस कर्मचारी बालाजी लक्ष्मण भंडारवाडा हे मार्केट यार्ड चौकात ड्युटीवर असताना संतोष कांबळे (वय २९),मल्हारी काळे (वय २७),रोहित कांबळे (वय २९) (सर्व रा. जय मल्हार चौक, बुधवार पेठ ) यांनी त्यांच्यावर हल्ला केला.वरील आरोपी एम एच 13 ई एल 9522 या दुचाकीवर ट्रिपल सीट येत होते.वाहतूक नियमभंग केल्याप्रकरणी थांबविण्यात आल्याने ते संतप्त झाले.यातील आरोपी संतोष कांबळे याने दारूच्या नशेत पोलिस कर्मचारी बालाजी भंडारवाडा यांची कॉलर पकडून शिवीगाळ करत स्वतः वरच ब्लेडने वार करून घेतले आहेत.

या प्रकरणी संतोष कांबळे,मल्हारी काळे,रोहित कांबळे या तिघांवर जेलरोड पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबतचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक डेरे तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia