ईच्छा भगवंताची परिवाराच्या वतीने पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा वाढदिवसानिमित्त विशेष सन्मान

सोलापूर :
राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन वाढदिवसानिमित्त जाहिरात, बॅनरबाजी आणि अन्य अनावश्यक खर्च टाळून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याचे आवाहन ग्रामविकासमंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले होते. त्यांच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत ईच्छा भगवंताची नवरात्रोत्सव मंडळाने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तब्बल २ लाख ५१ हजार रुपयांचा धनादेश जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमाबद्दल पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा शनिवारी विशेष सन्मान करण्यात आला पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शनिवारी हॉटेल बालाजी सरोवर येथे आयोजित बैठकीसाठी पालकमंत्री गोरे उपस्थित होते. यावेळी सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक २२ चे भाजपा नगरसेवक किसन जाधव यांनी ईच्छा भगवंताची परिवाराच्या वतीने त्यांना कमळाचे फूल, बजरंग बलीची मूर्ती आणि सोलापूरची ग्रामदेवता श्री रूपाभवानी देवीचा प्रसाद देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी मनोगत व्यक्त करताना पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, माझ्या वाढदिवसानिमित्त ईच्छा भगवंताची नवरात्र महोत्सव मंडळाने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेत तब्बल दोन लाख ५१ हजार रुपयांचा धनादेश जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला, ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे. वाढदिवसावर अनावश्यक खर्च करण्याऐवजी गरजू शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याचा मंडळाचा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे संकटाच्या काळात शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. या उपक्रमाचे त्यांनी विशेष कौतुक केले यावेळी नगरसेविका चैत्रालीताई शिवराज गायकवाड,कल्पनाताई कदम,सामाजिक कार्यकर्ते शिवराज गायकवाड, युवा नेते चेतन नागेश अण्णा गायकवाड, श्रीकांत गिड्डे यांच्यासह ईच्छा भगवंताची परिवाराचे पदाधिकारी उपस्थित होते.



