पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या प्रत्येक मतदाराला भाजपाकडून तीन वेळा संपर्क
भाजपाची प्रचारात आघाडी : भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा जोरदार संपर्क

सोलापूर : प्रतिनिधी
पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव आणि शिक्षक मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या प्रचारासाठी भाजपाकडून प्रत्येक मतदाराला तीन वेळा संपर्क केला जात आहे. भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केलेल्या संपर्कामुळे भाजपाने प्रचारात आघाडी घेतली आहे.

दोन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी भाजपाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी शहर पिंजून काढले आहे. पत्रक वाटप, गृह भेटी, वैयक्तिक संपर्कावर भारतीय जनता पार्टीने भर दिला असून पदवीधर तसेच शिक्षक मतदारांना भेटून त्यांना महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव आणि कौस्तुभ गावडे यांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पदवीधरांचे आणि शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी महायुतीचे हे दोन्ही उमेदवार सक्षम असून आम्ही या उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचे मतदारांनी भेटी दरम्यान सांगितले.

भाजपाने प्रचारात मोठी आघाडी घेतल्यामुळे शहरात महायुतीच्या उमेदवारांसाठी अत्यंत अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची जागा मिळवण्यासाठी भाजपाची संपूर्ण यंत्रणा जोरदार कामाला लागल्यामुळे भाजपासाठी ही निवडणूक सोपी झाल्याचे चित्र आहे.

एक मतदाराशी तीन वेळा संपर्क हे सूत्र ठरवून भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते विविध टप्प्यांमध्ये प्रत्येक मतदाराला तीन वेळा थेट संपर्क करीत आहेत. शहर स्तरापासून मंडल तसेच बूथ स्तरापर्यंत सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची यंत्रणा या कामी प्रयत्न करत असून यामुळे भाजपाने प्रचारात आघाडी घेतली आहे.




